शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे वर्षभरात कामगार नोंदणीचे एक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:58 IST

कार्यालयाअभावी मजूरांची फरफट : योजना असूनही माहितीअभावी अनभिज्ञ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : जिल्हानिर्मितीला 20 वर्ष उलटूनही 12 जिल्हा कार्यालयांची प्रतिक्षा आह़े यामुळे जिल्हावासियांची परवड होत असल्याचा प्रत्यय सध्या येत आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी चालवण्यात येणा:या योजनांची माहितीच मिळत नसल्याने त्यातील लाभांपासून ते अनभिज्ञ आहेत़ जिल्ह्यात आजघडीस किमान 20 हजार बांधकाम कामगार आहेत़ ठिकठिकाणी होणारी खाजगी आणि शासकीय बांधकामे यावर दरनिर्वाह करणा:या कामगारांना ठेकेदाराकडून मिळणारा दैनंदिन रोजगार वगळता कामगार कल्याणाच्या कोणत्याच योजनेतून लाभ मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून वार्षिक 1 कोटी रूपयांर्पयत निधी जिल्हास्तरावर खर्च होत असताना कामगार लाभापासून वंचित असल्याचे चित्र आह़े यामुळे जिल्ह्यात कामगार अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची मागणी होऊ लागली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी धुळे येथील कामगार अधिकारी कार्यालयात करण्यात येत़े 2010 पासून आजवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 11 हजार कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती कार्यालयाने दिली आह़े 18 ते 60 या वयोगटातील कामगारांसाठी विवाह अनुदान, मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, कामगारांना कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन हजारार्पयत खर्च, कामाच्या ठिकाणी अपघात होऊन अपंगत्त्व आल्यास 2 रूपयांची आर्थिक मदत देण्यासह 15 प्रकारच्या योजना चालवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ गेल्या 7 वर्षात दोन्ही जिल्ह्यातील 850 लाभार्थी कामगारांना विम्याची रक्कम देण्यात आल्याची माहितीही कार्यालयाकडून देण्यात आली आह़े विविध आजार आणि त्यासाठीचा उपचाराचा खर्च राजीवगांधी जीवनदायिनी योजनेद्वारे करण्यात येत असल्याचे कामगार अधिका:यांनी दिली आह़े एकीकडे शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर योजना राबवण्यात येत असताना जिल्ह्यात नेमक्या किती लाभार्थीना त्याचा लाभ मिळाला, याबाबत मात्र माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नाही़ यामुळे कामगाराचे नेमके कल्याण कसे झाले याबाबतच साशंकता आह़े राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी मुंबई येथील मुख्यालय असलेल्या इमारत बांधकाम मंडळांतर्गत केली जात़े शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर यांचा समावेश असलेल्या या मंडळाने बांधकाम कामगारांना कामावर घेताना असंख्य अटी शर्ती घालून दिल्या आहेत़ मंडळाच्या निर्देशानुसार वर्षभर कामगारांच्या नोंदण्या आणि त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात़ शासनाच्या जिल्हा कामगार अधिकारी यांच्यामार्फत ह्या योजना राबवण्यात येत असल्या तरी रिक्त पदांमुळे येथेही समस्या आहेत़आजघडीस नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी एकच कामगार अधिकारी आह़े नंदुरबार जिल्ह्यात कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येत आह़े यातून अद्यापर्पयत 60 जणांची नोंदणी झाल्याची माहितीही देण्यात आली आह़े नंदुरबार येथे कार्यालय नसल्याने गरजू कामगार धुळे येथे जावून कामगार असल्याची नोंदणी करून घेतात़ नोंदणी झाल्यावर त्यांना फोटो-ओळखपत्र देण्यात येत़े शासनाच्या घोषणेनुसार कामगारांच्या मुलांना दज्रेदार शिक्षण, आरोग्य तपासणी, कुशल कामगारांचे प्रशिक्षण याबाबत कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े वर्षभरात किमान दोन वेळा कामगारांच्या योजनांचा आढावा घेण्याची गरज आह़े