अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते. प्रा. डॉ. एस. एस. भांडे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले होते. राष्ट्रीय विज्ञान आणि अनुसंधान संस्थान, भुवनेश्वर येथील वैज्ञानिक डॉ. रामानुजम श्रीनिवासन व भारतीय विज्ञान शिक्षण संस्था, बंगळुरू येथील वैज्ञानिक डॉ. सरवानंद पळनी यांनी मायक्रोस्कोपी या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विविध राज्यातील एकूण ६६९ संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी महाविद्यालयाची सातत्यपूर्ण उत्तरोत्तर प्रगती कशी होत आहे, ते विशद केले. डॉ. आर. एम. चौधरी यांनी प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन केले.
द्वितीय सत्रात प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी. एस. लोहार यांनी आपल्या संशोधन काळातील येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, याबाबत माहिती दिली. डॉ. ए. टी. कळसे यांनी या कार्यशाळेचा संशोधक व विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लाभ झाला ते सांगितले. संयोजन सचिव प्रा. डॉ. योगेश वसू यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर, डीबीटी समन्वयक डॉ. आर. झेड. सैयद, डॉ. एम. एम. पाटील, प्रा. एस. पी. फुलपगारे, प्रा. सागर पटेल, प्रा. एन. के. आठवले, प्रा. एम. बी. जगताप, प्रा. व्ही. एस. भोसले, प्रा. आर. पी. साळवे व प्रा. एच. पी. जाधव यांचे सहकार्य लाभले.