शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नोंदणी ठरतेय केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:34 IST

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ...

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े आतार्पयत या अभियानांतर्गत धुळे येथे 10 हजार 722, तर नंदुरबार येथे 1 हजार 160 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केवळ चार कर्मचा:यांचे पथक देण्यात आले आह़े त्यातील एक कर्मचारी कारकून असून त्याचा  प्रत्यक्ष नोंदणी कामात सहभाग नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान, धुळे-साक्री, शिरपूर-शिंदखेडा, नंदुरबार-नवापूर व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका अधिका:याची नेमणूक करण्यात आली आह़े संपूर्ण राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असत़े परंतु वरील 10 जिल्ह्यांमध्ये  विशेष अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाला ‘अटल विश्वकर्मा अभियान’ असे नाव देण्यात आले  आह़े राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील बांधकाम कामगार दुर्लक्षित आहेत़ त्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने ते त्यापासून वंचित राहत असतात़ त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यामुळे शासनाकडून अशा कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आह़े परंतु असे करीत असताना कामगार नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविणे गरजेचे होत़े परंतु तसे न करता केवळ चार सदस्यांच्या पथकावर दोन जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी आल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आह़े कामगारांची नोंदणी करताना कर्मचा:यांची मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे याचा परिणाम कामगारांच्या नोंदणी अभियानावरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही़