शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘यू-डायस फॉर्म’चे काम अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:53 IST

१५ मे अंतीम मुदत : २ हजार ५७ शाळांपैकी ५० शाळांचे फॉर्म भरणे बाकी

नंदुरबार : जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्रणालीव्दारे संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सध्या शिक्षण विभागाकडून सुरु आहे़ जिल्ह्यातील शाळांकडून आपआपल्या शाळेची संपूर्ण माहिती यू-डायस प्लस फार्मव्दारे भरण्यात येत आहे़ जिल्ह्यातील एकूण २ हजार ५७ शाळांपैकी ५० शाळांची माहिती भरण्याची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे़दरम्यान, शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे ५ एप्रिल ते ५ मेच्या दरम्यान भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते़ परंतु ५ मेपर्यंत सुमारे ३५ टक्के शाळांनी आपआपल्या शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे भरलीच नसल्याचे चित्र होते़ त्यामुळे शासनाकडून हे फॉर्म भरण्याची मुदत वाढवून १५ मेपर्यंत करण्यात आलेली आहे़ त्यामुळे साहजिकच आता उवरलेल्या काही दिवसांमध्येच शाळांना युध्दपातळीवर आपली माहिती या प्रणालीव्दारे भरावी लागणार आहे़ शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शासनाकडून शाळांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे़दरम्यान, केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय व समग्र शिक्षा या योजनेच्या तांत्रिक सहायक ग्रुप कार्यालयाने राष्ट्रीय रचना कार्यालयामार्फत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालयांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे संगणीकृत करण्यात येणार आहे़दरम्यान, यू-डायस प्लस फॉर्म भरण्यासाठी संबंधित सर्वच शाळांना स्वतंत्रपणे आयडी व पासवर्ड देण्यात आलेला आहे़ शाळांची माहितीमध्ये कोणी छेडखाणी करु नये यासाठी आयडी व पासवर्डबाबत केवळ मुख्याध्यापकांनाच माहिती देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़ त्यामुळे याचा वापर करुन शाळांच्या केवळ मुख्यध्यापकांनी आपल्या शाळेची सर्व माहिती या यू-डायस फॉर्ममध्ये संगणकीकृत करणे आवश्यक राहणार आहे़ दरम्यान, या माहीमध्ये शाळेची पटसंख्या, एकूण शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या, विविध योजनांतर्गत मिळणारे अनुदान, शाळेतील भौतिक सुविधा, शाळेतील क्रीडांगण, खेळाची एकूण उपलब्ध साहित्ये, मुलींसाठी आवश्यक स्वच्छतागृह आदी विविध माहिती यू-डायस फॉर्ममध्ये भरणे आवश्यक राहणार आहे़शाळा मुख्याध्यापकांनी १५ मेपर्यंत सर्व माहिती भरल्यानंतर मानव विकास विभागाकडून संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची जिल्हानिहाय ‘थर्ड पार्टी’कडून आॅडीट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे़ शाळांकडून भरण्यात आलेल्या माहितीमुळे केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया अनुदानांची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ त्यामुळे उर्वरीत शाळांनी लवकरात लवकर १५ मेपर्यंत आपल्या शाळांची माहिती संकेतस्थळावर भरावी असे आवाहन करण्यात येत आहे़