शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरण व फरशी पुलांचे काम अपूर्ण दुर्गम भागातील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:46 IST

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन ...

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावरील 51 फरशी पूलपैकी 22 पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्याच्या आतार्पयत झालेल्या कामाची चौकशी करून उर्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी दुर्गम भागातील त्रस्त जनतेकडून होत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. खडीचा दुसरा थर न टाकल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खडी टाकलेली नसल्याने रस्त्यावर उडणा:या धुळीमुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यादरम्यान 22 फरशी पुलांचे कामही अपूर्णावस्थेत असून दोन ठिकाणी तर कामच केलले नाही. काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम आवश्यक असताना संरक्षण भिंती बांधल्या नसल्याने  या द:याखो:यातून व घाट सेक्शनमधून जाणा:या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या साईडपट्टय़ाही केलेल्या नाहीत. तसेच पावसाचे पाणी निघण्यासाठी चारी बनविण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्यादरम्यान झालेले फरशी पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र डांबरचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच दूरवस्था झाली आहे. या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण पुलांचे बांधकाम पूर्ण करून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी खाई येथील सरपंच सेमटीबाई गुलाबसिंग पाडवी, उपसरपंच हांजा प्रभा पाडवी, कंकाळामाळचे सरपंच जलसिंग रतन्या पाडवी, उपसरपंच दिवल्या बाज्या वळवी, ग्रा.पं. सदस्य संपत कालूसिंग पाडवी, वसंत राश्या वसावे, नमी शिवाजी पाडवी, सुनील जोंदा पाडवी, रामा खोजल्या वसावे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.