शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
2
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
3
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
4
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
5
पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील
6
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
7
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
8
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
9
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
10
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
11
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
12
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
13
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
14
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
15
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
16
विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश
17
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
18
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
19
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
20
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

तापी-बुराई योजनेचे काम व उपसा योजना दुरुस्ती मृगजळच ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

मनोज शेलार तापी-बुराई नदीजोड प्रकल्प आणि तापीवरील २२ उपसा सिंचन योजना मृगजळच ठरतील की काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना ...

मनोज शेलार

तापी-बुराई नदीजोड प्रकल्प आणि तापीवरील २२ उपसा सिंचन योजना मृगजळच ठरतील की काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील हे परवा जिल्ह्यात येऊन गेले. ते या योजनांबाबत मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना लागून होती. परंतु केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी बैठक घेऊन काढता पाय घेतला. त्यामुळे तापी-बुराई योजनेचे फळ या पिढीला तरी चाखता येणार नाही यावर आता शेतकऱ्यांचेही एकमत झाले आहे. तर उपसा योजनांनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणखी किती वर्षांनी पोहचेल याचीही शाश्वती नाही.

नंदुरबार जिल्ह्यतील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अपूर्ण योजना पूर्ण करणे आवश्यक आहे. निधीअभावी अनेक योजना रखडल्या आहेत. काही योजना पूर्ण झाल्या, परंतु त्यांच्यातून पाटचाऱ्या, वितरिका काढल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे त्या बंधारे, धरणांचा उपयोग शेतकऱ्यांच्या दृष्टीने शून्य आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. वर्षभर पाणीसाठा राहूनही ते पाणी शेतापर्यंत पोहचू शकत नाही हे शल्य शेतकऱ्यांना बोचत आहे. राजकीय मानसिकता नसणे, पाठपुरावा करणारी ठोस यंत्रणा नसणे या बाबींमुळे जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न यापुढेही कायम राहणार यात शंका नाही.

तापी-बुराई हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प नंदुरबार व साक्री तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला तेव्हाची व आता या प्रकल्पाची किंमत पाहता ती दुप्पट झाली आहे. या प्रकल्पात वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीवरून बदलदेखील झाला आहे. आता बलदाणेचा अमरावती प्रकल्प, शिवण नदीवरील विरचक प्रकल्पालाही या योजनेतून फायदा झाला पाहिजे म्हणून मागणी पुढे आली आहे. त्यामुळे प्रकल्पाला दिवसेंदिवस फाटे फुटू लागले आहेत. दुसरीकडे प्रकल्पासाठीची निधीची तरतूद दरवर्षी अगदीच तुटपुंजी राहत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या ८ किलोमीटर पाईप लाईनचे ९० टक्के व दुसऱ्या टप्प्यातील ६ किमी पाईपलाईनचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. जॅकवेलचे जमीन तलांकापर्यंत २० मीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सद्या हा प्रकल्प निधीअभावी ठप्प झाला आहे. निधी उपलब्धतेची अशीच गती राहिली तर पुढील ३० वर्षात देखील तो पूर्ण होणार नाही. त्यामुळे या पिढीला तरी या योजनेचे फळ चाखता येणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे.

दुसरीकडे तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजची कामे २००९ मध्ये पूर्ण झाल्यानंतर तेव्हापासून प्रतिवर्षी १५३.९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होतो. प्रस्तावात समाविष्ट २२ उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून ९०.५० द.ल.घ.मी. पाणीवापर होऊन १४,४१३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजनांच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील २६, शहादा तालुक्यातील १४ व नंदुरबार तालुक्यातील १९ अशा एकूण ५९ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. परंतु दुरुस्तीच्या कामांनाही सद्या खो बसला आहे. निधीच नसल्याने आणि संबंधित विभागाची मानसिकताच नसल्याने काम ठप्प आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उपक्रमानिमित्त जिल्ह्यात आले. त्यांनी पाटबंधारे, जलसंपदा विभागाची बैठक देखील घेण्याचे नियोजन केले. दुपारी होणारी बैठक सायंकाळी सहा वाजता झाली. ती देखील अगदीच औपचारिकता म्हणून. केवळ अधिकारी, उपस्थित लोकप्रतिनिधी यांचे ऐकून घेतले. घोषणा काहीच केली नाही. किमान या दोन प्रकल्पांबाबत तरी काही तरी ठोस आश्वासन त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची होती. त्यासाठी राजकीय नेते, पदाधिकारी, शेतकरी संघटना यांनी त्यांना निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. परंतु मंत्र्यांकडून काहीही ठोस मिळाले नाही. त्यामुळे तापी-बुराई योजना आणि तापीवरील २२ उपसा योजनांची दुरुस्ती या बाबी जिल्ह्यावासीयांच्या दृष्टीने मृगजळच राहतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.