शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या रेल्वे बोगद्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:45 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा लागून राहिलेल्या शहरातील दुसऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात झाले ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा लागून राहिलेल्या शहरातील दुसऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात झाले आहे. नळवा रस्त्यावर पहिल्या बोगद्याच्या शेजारीच हा बोगदा बसविण्यात येत आहे. तीन वर्षांपासून तयार करून ठेवण्यात आलेला बोगदा रेल्वेच्या परवानगीअभावी बसविला जात नव्हता. परंतू रेल्वेने कामाला आता परवानगी दिली असून कामाला सुरूवात झाली आहे. शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु दहा वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याद्वारे देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. परंतु निधी मंजुर होताच निवडणुका लागल्या आहे भाजप सरकार सत्तेत आले. ही त्यामुळे निधी अडकला. त्यानंतर आमदार रघुवंशी यांनी पाठपुरावा करून निधी मिळविला. तो पालिकेकडे वर्ग देखील झाला. दोन वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली होती. नगरपालिका निवडणुकांच्या आधीच हे काम होणार असे बोलले जात होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते होऊ शकले नव्हते. आता हे काम सुरू झाले असल्साने दिलासा मिळाला असून कामाला गती दिली जात असल्याचे चित्र आहे. 

एक कोटीचा निधी   नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीटद्वारे बोगदा आधी बाहेर तयार करण्यात आला आहे.  आता हा बोगदा रेल्वे रुळाच्या खालील जागेत बसविण्यात येणार आहे. यामुळे वेळेचीही बचत होईल आणि रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीलाही फारसा अडथळा येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे.  नवीन बोगदा झाल्यास या  मार्गाने प्रवास करणारे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याने शहराच्या साैंदर्यीकरणार वाढच होणार आहे.