तळोदा पालिकेने लक्ष देण्याची अपेक्षा
तळोदा : शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर दुकाने व घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी होत आहेत. याकडे पालिकेने लक्ष देत गटारी साफ करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
ग्रामीण भागात किरकोळ आजार वाढले
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागात किरकोळ आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात सध्या गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने रुग्णांची तपासणी मोहीम सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुर्गम भागात शुद्ध पाण्याचा प्रश्न गंभीर
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लावलेले हातपंप नादुरूस्त झाल्याने शुद्ध पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.