शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी उभरांढीच्या महिलांचा मोर्चा

By admin | Updated: February 1, 2017 00:25 IST

उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला

जैताणे : साक्री तालुक्यातील उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला. दारूमुळे तरुण पिढीचे नुकसान होत असून तत्काळ दारुबंदी करावी, अशी मागणी संतप्त झालेल्या महिलांनी आक्रमकपणे केली आहे. यासंदर्भात निजामपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजरुन पटले यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की 26 जानेवारीला ग्रामपंचायत सभेमध्ये दारुबंदीचा ठराव पास करण्यात आला आहे. तरीही अद्याप दारू बंदी झालेली नाही. खुलेआम राजरोसपणे उभरांढी गावात दारू पाडली जात असल्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. यावेळी केवलबाई सावळे, नवसाबाई सावळे, मुक्ताबाई भदाणे, कल्पना ठाकरे, र}ा सावळे, उन्नती सावळे, राजबाई सावळे, सुंदराबाई सावळे, मुक्ताबाई सावळे, शोभा खैरनार, निंबा सावळे, सुनंदा भदाणे, सुरूबाई खैरनार, मिराबाई महाले, रेखा बागुल, उजाभाई भदाणे, शोभा शेलार, शामा शेलार, मंगल शेलार, नीलाबाई शेलार व इतर महिला ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी कारवाई करावी साक्री तालुक्यातील उभरांढीसह, पाचमौली, भोरटीपाडा, रायतेल, पिंझारझाडी व इतर लहान पाडय़ामध्ये हातभट्टीची दारू तयार करण्याचे अवैधपणे सुरू आहे. तसेच बाहेरूनही गावठी दारू गावात आणली जात आहे. परंतु, संबंधित दारू पाडणा:यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 8 कि.मी. महिला ग्रामस्थांनी केली पायपीट उभरांढी ते निजामपूर हे अंतर 8 कि.मी आहे. मंगळवारी सकाळी गावातील महिला पायपीट करीत निजामपूर पोलीस स्टेशनवर आल्या. यावेळी त्यांनी दारू विक्री करणा:यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी  काही महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. उभरांढी भाग हा कोरडवाहू शेतीचा म्हणून ओळखला जातो. त्यात गावातील साक्षरताही कमी असल्यामुळे अनेकजण दारूच्या नादी लागले आहे. त्यामुळे संसार उद्ध्वस्त होत आहे. गावातील काही निवडक व्यक्तींमुळे तरुणाई पण दारूच्या आहारी जात असल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला.