शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कोरोनासोबत लढा देण्याचा महिलांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नावली व धवळीपाडा येथील महिलांनी पुढाकार घेत कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील नावली व धवळीपाडा येथील महिलांनी पुढाकार घेत कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ यांतर्गत येथील महिला गावात जागृती करण्यासोबत स्वच्छता करुन नागरिकांना स्वच्छ राहण्याचे सल्ले देत आहेत़नावली येथे गेल्या आठ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला होता़ यावेळी महिलांनी एकत्र येत वृक्षसंगोपन आणि कोरोना आजारावर जनजागृती करण्याचा निर्धार केला होता़ या उपक्रमानंतर गेल्या आठवडाभरापासून महिला दोन्ही गावात वृक्षसंगोपन, कचरा मुक्त गाव आणि कोरोनापासून बचाव यांचा जागर करत आहेत़ त्यांच्या या अनोख्या प्रयत्नामुळे गाव चकाचक झाले असून मुलांना हात धुण्याचे प्रशिक्षण देत स्वच्छता ठेवण्याचा आग्रह या माता धरु लागल्या आहेत़कोरोना आजार तसेच प्लास्टीकचे होणारे दुष्परिणाम यावर ग्रामसेविका व्ही.एम.जाधव यांनी महिलांना माहिती दिल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ यात जिल्हा परिषद सदस्या सुशीलाबाई कोकणी, सरपंच गौरीबाई कोकणी, उपसरपंच निताबाई कोकणी, ओम साई महिला ग्रामसंघ नावली, (उमेद) शीतल प्रधान, गीता प्रधान, नीता प्रधान, भारती गावीत, गंगा वळवी, संगीता प्रधान, रमिला वळवी ह्या महिलांसह गावातील इतर महिलाही सहभागी होत असून त्यांच्या या प्रयत्नाने गावात सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे़महिलांकडून दररोज नावली आणि धवळीपाडा येथे कोरोनाबाबत जागृती करुन अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगण्यात येत आहे़ ग्रामस्थांनी कोरोना आजाराबाबत शासनाकडून जनजागृतीसाठी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे़ जंगल कमी होत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने वृक्ष लागवड अन संगोपन करण्याचा निर्धार केला असून हातात झाडू घेऊन त्या सर्व गावात स्वच्छता करण्यावर भर देत आहेत़ महिलांच्या या उपक्रमाची सध्या गावोगावी चर्चा असून कोरोनावर कोणतेही प्रशिक्षण न घेता ग्रामीण भागातील महिला जागृती करत असल्याने त्यांचे कौतूक करण्यात येत आहे़