नंदुरबार : शहरातील परदेशीपुरा भागात मागील भांडणाची कुरापत काढून महिलेस मारहाण करण्यात आली़ गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे़मनिषा राजकुमार परदेशी रा़परदेशीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सुनिता गणेश मराठे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला़ यातून सुनिता मराठे यांनी घरात घुसून काठी व बॅटने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़दरम्यान शुक्रवारी स्मिता मनोहर मनोहर मराठे यांनी फिर्याद दाखल केली होती़ यानुसार मनिषा राजकुमार परदेशी, राजकुमार परदेशी, अशोक परदेशी, जसवंत ऊर्फ मक्कू परदेशी सर्व रा़ परदेशीपुरा यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काहीएक कारण नसताना घरात घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात जसवंत परदेशी याने त्याच्या खिशातील चाकू काढून स्मिता मराठे यांच्यासह आणखी एकावर वार करत जखमी करुन शिवीगाळ केली़ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर जबाब प्राप्त झाला होता़ मनिषा परदेशी, राजकुमार परदेशी, अशोक परदेशी, जसवंत परदेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करत आहेत़
परदेशीपुऱ्यात महिलेवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:43 IST