शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डाकीणच्या संशयावरून महिलेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : डाकिणीच्या संशयावरून धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील महिलेचा छळ होत असल्याच्या प्रकार समोर आला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : डाकिणीच्या संशयावरून धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील महिलेचा छळ होत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील ४० वर्षीय महिला तंत्रमंत्राने जादूटोणा करीत असून, तिच्यामुळे आपल्या कुटुंबाची हानी होत असल्याचा संशय येथील रामसिंग पटले व बिणाबाई पटले यांना दोन वर्षापासून होता. या संशयातून रामसिंग पटले व बिनाबाई पटले यांनी आपल्या शेजारी राहणाºया एका महिलेला डाकीण ठरविले होते.डाकीणीच्या गैरसमजामुळे पटले कुटुंबीय कुरापती काढून त्या महिलेशी वेळोवेळी भांडण करीत होते. याबाबत गावातील पंचांनी दोन्ही पक्षांना समज देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात रामसिंग पटले, दारासिंग भोग्या भिल हे अन्य सहकाऱ्यांसह डाकीण शोधण्यासाठी मांत्रिकाकडे गेले. तेथून आल्यानंतर रामसिंग पटले व त्यांच्या पत्नी बिनाबाई पटले यांनी १३ नोव्हेंबर रोजी त्या महिलेला डाकीण ठरवून तू मंत्रतंत्र व जादूटोणा करते असे सांगून शिवीगाळ केली. तसेच तू जर इथून आपले घर हलवले नाही तर तुला व तुझ्या पतीला जीवेठार मारू अशी धमकीदेखील दिली होती.या प्रकारानंतर डाकीण ठरवण्यात आलेल्या महिलेने १६ नोव्हेंबर रोजी धडगाव पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या महिलेला त्रास देणाºयांना समज दिली होती. परंतु संबंधित व्यक्ती हे त्या महिलेला त्रास देण्याचे थांबवत नव्हते. त्यामुळे २२ नोव्हेंबर रोजी या महिलेच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेदेखील तक्रार अर्ज दिला.दोन-तीन दिवसांपूर्वीच दारासिंग पटले व बिनाबाई पटले यांनी डाकीन ठरवण्यात आलेल्या महिलेच्या घराकडे जाणारा रस्ता काटे टाकून बंद केला आहे तसेच कुटूंबाला शिवीगाळ करणे व जीवेठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सातत्याने घडून येत आहेत. बुधवार ४ डिसेंबर रोजी पीडित महिलेने शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, महिला कार्यवाह भारती पवार, प्रविण महिरे, सुवर्णा मोरे आदींची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पिडीत महिला व कुटुंबियांसह शहाद्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याचे निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.