शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:10 IST

नवापूर येथील घटना : मितभाषी स्वभावाच्या हिरालाल झाल्टेंच्या मृत्यूने हळहळ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : शहरातील आंबेडकर चौक व गुजरगल्लीलगत पथदिव्याचे काम करीत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पालिकेचे कंत्राटी विद्युत वायरमन हिरालाल मोतीराम झाल्टे (35) हे खांबावरुन उतरत असताना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी     झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.विद्युत पथदिव्याचे काम करीत असताना काही मित्रांसोबत थट्टामस्करी झाली व काही सेकंदाच्या अंतराने हिरालाल झाल्टे जमिनीवर कोसळल्याने मित्रांना काय करावे हेच सूचेनासे झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या बरगडय़ांना मोठी हानी पोहोचल्याने उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात प}ी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरुष काळाने हिरावून नेल्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून काही प्रय} करावेत यासाठी माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे व सहका:यांनी जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार प्रमोद वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांची पालिकेत भेट घेऊन चर्चा करुन निवेदन दिले. मयत हिरालाल झाल्टे यांच्या परिवारास आर्थिक मदत व मयत हिरालाल झाल्टे यांच्या प}ीस सेवेत सामावून घेण्याबाबतची मागणी त्यांनी केली.नवापूर शहरात पालिकेच्या सर्व विद्युत खांब व जोडण्या यांची इत्यंभूत व खडानखडा माहिती हिरालाल झाल्टे यांना होती. कुणाही नगरसेवकाकडे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विद्युत समस्येबाबत तक्रार झाल्यास नगरसेवक सरळ झाल्टे यांना फोन करीत असत. दिवस-रात्र वा सुटी अशी काही एक सबब न मानता नागरी समस्यांचे निराकरण करुन त्या संबंधित नगरसेवकांना काम झाल्याचा संदेश फोन करुन द्यायचा, असा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, बांधकाम सभापती हारुन खाटीक, नगरसेवक आरीफभाई बलेसरिया, दर्शन पाटील, बबिता वसावे, मंगला सैन, विशाल सांगळे, माजी नगरसेवक अजय पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करुन त्यांच्या कुटुंबासाठी काय चांगले करता येईल याविषयी भरत गावीत यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. कुटुंबातील जवळच्या नात्यात 20 मे रोजी लग्न कार्य असल्याने शनिवारपासून ते रजेवर जाणार होते.नवापूर पालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी हिरालाल झाल्टे यांच्या मृत्यूनंतर तात्काळ त्यांच्या पत्नीस प}ीस नगरपालिकेत मक्त्यावर लावणे व सामावून घेण्याबाबत तथा त्यांना सामावून घेतल्यानंतर त्यांच्या उदनिर्वाहाकरिता त्यापोटी आर्थिक मदत होईल या दृष्टीकोनातून योग्य ते प्रय} करण्याबाबतचे पत्र दिले आह़े नगरपरिषदेच्या पुढील होणा:या सर्वसाधारण सभेत मयत झाल्टे यांच्या प}ीस शासन सेवेत सामावून घेण्याबाबत योग्य तो विनंती प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र पालिकेने झाल्टे यांच्या कुटूंबियांना दिले आह़े दरम्यान संबधित मक्तेदार यांच्याकडून आर्थिक मदत देण्याचे म्हटले आह़े चर्चेच्यावेळी माजी नगरसेवक रमला राणा, जितेंद्र अहिरे, मनु बि:हाडे, सुनील वाघ, अजय पाटील व आकाश बि:हाडे आदी उपस्थित होते.