शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधीचा सुकाळ तरीही समस्या का? प्रधान सचिवांनी उपस्थित केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. सुविधाही भरपूर उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. सुविधाही भरपूर उपलब्ध करून दिल्या आहेत. असे असतांना आरोग्य सेवेच्या तक्रारीच नको. परंतु दुर्देवाने तक्रारी असल्याचे दिसून येते. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आणि ग्रामिण रुग्णालयांमध्ये दररोज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे अशा सुचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा.प्रदीप व्यास यांनी येथे आयोजित बैठकीत दिल्या.   आकांक्षीत जिल्ह्याच्या अनुषंगाने कोवीडनंतरची आरोग्य सेवा, आरोग्य सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना याची पहाणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात दाखल होते. जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांची पहाणी या पथकांनी केली. तिसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व पथकांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य विभागाच्या संचालक डॅा.अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक डॅा.सतीष पवार, जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड जि.प.सीईओ रघुनाथ गावडे यांच्यासह पथकातील संचालक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रधान सचिव डॅा.व्यास यांनी सांगितले, जिल्ह्याची निवड आकांक्षीत जिल्हा म्हणून झाली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्याची चांगली संधी आहे. जिल्ह्याला आधीपासूनच निधीची कमरता नाही. त्यामुळे गाव     पातळीवर आरोग्य सेवा पोहचण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. काही ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी उपिस्थत राहणे आवश्यकच आहे. जिल्ह्याने कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. कोरोनाला अटकाव देखील ठेवला आहे. आता कोरोना पश्चात आरोग्य सेवा आणखी सुधारावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सिकलसेल, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू रोखण्यासाठी त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे काम मोलाचे आहे. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक कर्मचारीकडे थर्मल स्कॅनींग, ऑक्सीमिटर हे दिलेच पाहिजे. जिल्ह्यात ते दिले गेले नसल्याचे निर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.  तरंगता दवाखानाचा उद्देश हा त्या त्या भागात हा दवाखाना जाऊन त्या परिसरातील गावांमध्ये सोयी      देण्यात याव्या असा असतांना गावकऱ्यांना तेथे बोलविले जाते हे चुकीचे असल्याचेही व्यास यांनी सांगितले.सुरुवातीला तालुकानिहाय नियुक्त दहा पथकांनी त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांचे सादरीकरण केले. त्यात अडचणी, समस्या, मिळणाऱ्या सुविधा, आवश्यक उपाययोजना यांचा त्यात समावेश होता.संचालिका डॅा.अर्चना पाटील, डॅा.सतीष पवार यांनीही विविध बाबींचा आढावा घेत मार्गदर्शन    केले.  जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.नितीन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.रघुनाथ भोये यांनी देखील समस्या व अडचणी मांडल्या. पहाणी करणाऱ्या पथकांमध्ये संचालक रवींद्र शेळके, सहसंचालक डॅा.नितीन अंबोडकर, डॅा.विजय कंदेवाड, डॅा.आर.एस.पारधी, डॅा.पटन शेट्टी, डॅा.अडकेकर, डॅा.संजीव जाधव, डॅा.प्रकाश पाडवी, डॅा.उमेश शिरोडकर, डॅा.अरुण यादव, डॅा.गोविंद चौधरी आदींचा त्यात समावेश होता.