शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

राज्यातील पहिल्याच गडावर कोण बांधणार विजयाचे तोरण? भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 9, 2024 09:03 IST

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्वच स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी ना केल्याने पक्षाने माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली.

- रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारचा गड राखण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून त्यामुळे निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्वच स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी ना केल्याने पक्षाने माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. समोर नवखा उमेदवार असल्याने भाजपला सुरुवातीला विजयाचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतल्याने शिवाय भाजपतील नाराज घटकांना जोडण्यात काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी ठरल्याने निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डाॅ. हीना गावीत ह्या विजयाची हॅटट्रीक साधणार की १० वर्षानंतर काँग्रेस पुन्हा आपला गड ताब्यात घेणार याकडे आता लक्ष लागून आहे.

मंत्र्यांची प्रतिष्ठा पणालाभाजपच्या उमेदवार डाॅ. हीना गावीत ह्या मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांच्या कन्या आहेत तर काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र आहेत. त्यामुळे ही निवडणूक डाॅ. विजयकुमार गावीत विरुद्ध ॲड. के. सी. पाडवी यांच्यातच असून या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राजकारणाचे बदलते रंगजिल्ह्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले आहेत. ज्यांच्याविरोधात भाजपने २०१४ ची निवडणूक लढवली त्यांचे वारसदार तसेच माजी मंत्री ॲड.पद्‌माकर वळवी व आमदार आमश्या पाडवी महायुतीसोबत आले. ॲड.के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना जि.प. निवडणुकीत पराभूत करणारे गणेश पराडके महाविकास आघाडीसोबत आहेत.

गटातटाचा नेमका काय होणार परिणाम?nमतदारसंघात सहा विधानसभा  मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेस व एका ठिकाणी शिंदेसेनेचे आमदार आहेत. याशिवाय विधान परिषदेचे दोन्ही सदस्य महायुतीसोबत आहेत. मात्र शिंदेसेनेचे बहुतांश पदाधिकारी महायुतीच्या          प्रचारापासून लांब राहिले आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्देसंविधान बदलण्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप करुन आदिवासी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न. वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत आरोप-प्रत्यारोप करुन एका गटाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या गटाचा पक्षपात केल्याचा आरोप. मंत्री, खासदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एकाच घरात असल्याने घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४