शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात उसावर पांढ:या माशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:36 IST

तळोदा : यंदाच्या अत्यल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े ...

तळोदा : यंदाच्या अत्यल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े तालुक्यातील उसावर तर पांढ:या माशीचा प्रादुर्भाव झाला  आह़ेएकेकाळी तळोदा तालुक्यात पाण्याची पातळी 40 ते 50 फुटावर होती़ त्यामुळे तालुकाही सुजलाम् सुफलाम् होता़ परंतु अलीकडच्या 10 ते 12 वर्षापासून वर्षागणिक पाण्याची पातळीत घट होत असल्याचे दिसून येत आह़े यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच शेतक:यांचे कृषिपंप कमकुवत होण्यास सुरुवात झाली होती़ आता तर ते पूर्णत: निकामी झालेत़ त्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची नाजूक अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आह़े तळोदा शहरानजीक तलावडी शिवारातील एका शेतात उसाचे पीक पाण्याअभावी पूर्ण सुकून गेल्याने तो कडब्यासारखा भासत आह़े वास्तविक पीक मोठे करण्यासाठी शेतक:यांनी प्रचंड खर्च केला होता़ सदर पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी कृषिपंपच बंद झाल्यामुळे पीकदेखील वाया गेले आहेत़ गेल्या वर्षी पाण्याच्या पातळीअभावी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े मुबलक पाणी नसल्याने केळी, पपई या पिकांचे क्षेत्र तर अत्यल्प असल्याचे शेतकरी सांगतात़ दरम्यान, गहू व हरभराच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आह़े या पिकांना पोषक असणारी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांची स्थितीही चांगली असल्याचे शेतकरी म्हणतात़ यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लावणी केलेल्या उसावर सध्या व्हाईट फ्लॉय माशीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे उसाची वाढच थांबली आह़े साहजिकच शेतकरी औषध फवारणी करून मेटाकुटीस आला आह़े या माशीच्या आक्रमणामुळे उसाची पाने कुरतडली जात आहेत़ परिणामी त्याची वाढदेखील खुंटली आह़े एकीकडे पाण्याअभावी कसे-बसे सुनियोजन करून शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्नात असताना दुसरीकडे सदर माशीच्या प्रादुर्भावामुळे पीक नष्ट होत आह़े कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतक:यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, अशी शेतक:यांची मागणी आह़े