शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निविदा कमी दराच्या भरल्यावर कामेही कमी दर्जाचीच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:22 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कमी दराने निवीदा भरून कामांचा दर्जा टिकवला जात नाही, अर्ध्यातून कामे सोडून ठेकेदार ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कमी दराने निवीदा भरून कामांचा दर्जा टिकवला जात नाही, अर्ध्यातून कामे सोडून ठेकेदार निघून जातात. केवळ बिलं काढण्यापुरते त्यांची कामे राहतात. त्यामुळे तब्बल २० ते २५ टक्के कमी दराच्या निविदा भरण्यामागचे गौडबंगाल काय? याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग दखल का घेत नाही असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केला. अशा कामांवर त्या त्या भागातील सदस्यांनी लक्ष ठेवावे जेणेकरून कामाचा दर्जा टिकून राहील अशी अपेक्षा अध्यक्षा सिमा वळवी यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषद स्थायी समितीची ॲानलाईन सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सभापती अभजित पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत यांच्यासह सदस्य सी.के.पाडवी, धनराज पाटील, देवमन पवार, मधुकर नाईक यांच्यासह त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कमी दराच्या निविदा भरण्याच्या प्रकाराबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या विविध कामांच्या निविदा भरतांना त्या २० ते २५ टक्के कमी दराने भरल्या जातात. त्यात मंजुरही होतात. एवढ्या कमी दराने निविदा भरून त्यात काम करणे ठेकेदारांना कसे परवडते. याचा अर्थ कामाचा दर्जा चांगला राहतो काय? ठेकेदार अर्ध्यातून काम सोडून पळून जातात. केवळ बिलं काढण्यापुरते ते मर्यादीत राहतात ही बाब धनराज पाटील, अभिजीत पाटील यांनी समोर आणली. त्यावर बोलतांना अध्यक्षा सिमा वळवी यांनी अशा कामांवर सदस्यांनी लक्ष ठेवावे, ठेकेदारास चांगल्या दर्जाची कामे करण्यास प्रवृत्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती राम रघुवंशी यांनीही कामांवर लक्ष ठेवले जाईल. पुर्ण कामाशिवाय बिलं काढले जाणार नाही याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी अशा सुचना दिल्या. ग्रामपंचायत विभाजनास मंजुरीधडगाव तालुक्यातील गेंदा ग्रामपंचायतींचे विभाजन करून त्यातून तीन वेगळ्या ग्रामपंचायती तयार कराव्या असा प्रस्ताव बैठकीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली. गेंदा ग्रामपंचायतीमधून माळ, खुटवडा, शेलदा या तीन नवीन ग्रामपंचायती निर्माण झाल्या आहेत. आता हा ठराव विभागीय आयुक्तांकडे जाईल त्यानंतर विभाजनाचे नोटीफिकेशन निघेल. बैठकीत आरोग्य, शिक्षण, रोहयोसह इतर विविध  विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.