शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चालकच बस पळवून नेतो तेंव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:41 IST

नंदुरबार : दारूची नशा चढल्याने बस चालविणेही कठीण झालेल्या चालकाने अखेर बस दुभाजकाला ठोकली. त्यानंतर वाहक व प्रवासी खाली ...

नंदुरबार : दारूची नशा चढल्याने बस चालविणेही कठीण झालेल्या चालकाने अखेर बस दुभाजकाला ठोकली. त्यानंतर वाहक व प्रवासी खाली उतरताच कारवाईच्या भितीने चालकाने एस.टी.सह धूम ठोकली. अखेर त्याला पातोंडानजीक अडविण्यात पोलीस व एस.टी.च्या अधिका:यांना यश आले. हा थरारक प्रकार घडला नंदुरबारातील वळण रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या अलीकडे. दरम्यान, चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. सध्या परिवहन व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. सर्वच स्तरातून अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे असतांना एस.टी.विभागाने मात्र या मोहिमेलाच खो दिल्याचे दिसून येत आहे. मद्यधुंद चालकांना डय़ुटी लावून एस.टी.चे अधिकारी प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. शहादा आगाराची नंदुरबार-शहादा (क्रमांक एमएच 39-156) ही बस नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नंदुरबार स्थानकातून   निघाली. बाजार समितीमार्गे वळण रस्त्याकडे जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण योग्य नसल्याची बाब प्रवासी व वाहकाच्याही लक्षात आली. चालक संजय पांडूरंग आव्हाड यास बस थांबविण्याच्या सुचना वाहकाने करेर्पयत त्याने दुभाजकाला बस ठोकली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरवून आगाराशी संपर्क साधत असतांनाच चालकाने पुन्हा स्टेअरींग हातात घेवून एस.टी.पुढे दामटली. उमर्दे रस्त्याने तो एस.टी.घेवून पसार झाला.प्रवाशांनी व तेथे असलेल्या नागरिकांनी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांना हा प्रकार सांगितला. शिंपी यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेत शहर पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा व नंदुरबार आगार प्रमुख यांना याची माहिती दिली. तिघे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोर्पयत एस.टी.सह चालक पसार झाला होता. आधीच मद्यधुंद त्यात बस दामटल्याने कुठे अपघात तर होणार नाही या भितीने वाहतूक शाखा,    शहर पोलीस व नंदुरबार आगाराचे कर्मचारी त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. अखेर पातोंडानजीक बससह     चालक सापडला. त्याला ताब्यात घेवून  बस नंदुरबार आगारात आणण्यात आली. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी व नंदुरबार आगाराच्या कर्मचा:यांनी बसमधील 40 ते 45 प्रवाशांना शहाद्याकडे जाणा:या दुस:या बसमध्ये सोय करून दिली. यावेळी बघ्यांनी देखील मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. वाहकाची तक्रारयाबाबत याच बसमधील वाहक प्रकाश कंटीराम चव्हाण यांनी  नंदुरबार शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून चालक संजय पांडुरंग आव्हाड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरार्पयत सुरू    होते.