शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वनीकरणाच्या कामावर जेव्हा मृत मजूर काम करतात तेव्हा़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:20 IST

नंदुरबार वनविभागातील चित्र : अंगठे मारणारे मजूर इंग्रजीतही सह्या करतात

ठळक मुद्देकारवाईसाठी वकिलामार्फत नोटीस दरम्यान या संदर्भात मुख्य वनसंरक्षक यांना वकिलामार्फत कारवाई करण्याची नोटिस पाठवण्यात आली आह़े माहिती अधिकारांतर्गत वेळावेळी पैसे भरून देखील अपूर्ण माहिती मिळाली आह़े माहिती आयुक्तांनी आदेश देऊनही माहिती पूर्ण मिळाली नसल्याचा

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मृत मजूर, शासकीय अधिकारी, राजकीय सभापती, शिक्षक अन् अभियंतेही रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करीत असल्याचा अजब प्रकार यापूर्वी जिल्ह्यात प्रशासनाने रंगवला होता़ आता वनविभागानेही त्याचीच पुनरावृत्ती केल्याचे मस्टर पाहणीनंतर प्रथमदर्शनी दिसून आले आह़े नंदुरबार वनविभागात 2011 ते 2014 या काळात झालेल्या विविध कामांचे मस्टर तपासले असता, अजब प्रकार उघडकीस आला आह़े वासदरा ता़ नंदुरबार येथील गट क्रमांक 59 मध्ये 30 हेक्टर क्षेत्रात अवतण वनांचे पुनर्वनीकरण करण्याचे काम करण्यात आले आह़े तसेच याच कालावधीत रनाळा गटातही वनविभागाने काम केले आह़े ही कामे एकाच कालावधीत झाली असून याठिकाणी मजूरांची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आह़े एकच मजूर एकाच वेळी दोन ठिकाणी काम कसे करू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आह़े याशिवाय या मस्टरांवरील काम करणा:या काही मजूरांची तपासणी केली असता, विकास फत्तेसिंग गावीत, प्रल्हाद नुरा गावीत हे इंग्रजीतून स्वाक्षरी करतात़ प्रत्यक्षात त्यांचे अंगठे घेण्यात आले आहेत़ तर काही मंजूरांच्या एका ठिकाणी अंगठे तर काही ठिकाणी इंग्रजीतून सह्याही दाखवण्यात आल्या आहेत़ ठाणेपाडा ता़ नंदुरबार रोप निर्मितीच्या विविध योजनांच्या कामातही मजूरांची नावे हजेरी पत्रात पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आह़े एवढेच नव्हे तर काही मृत मजूरदेखील वनविभागाने आपल्या मस्टरवर काम केल्याचे दाखविले आह़े कै़शांतीराम डोंगर पवार यांनी 7 ते 10 डिसेंबर 2013 या कालावधी काम केल्याचे दाखवण्यात आले आह़े प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 2013 रोजी झाला आह़े दुसरीकडे नाशिक येथे कंपनीत काम करणा:या कर्मचा:यांची नावे देखील वनविभागाने आपल्या मस्टरमध्ये टाकून त्यांनी काम केल्याचे दाखवण्यात आले आह़े एकूणच वनविभागाच्या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अफरातफर झाल्याचे प्राथमिक स्तरावर  दिसून येत असून याबाबत मुख्य वनसरंक्षक काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आह़े