शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वजन न करणारा ‘वजन काटा’ सभागृहात गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कुपोषणावर नियंत्रणासाठी उपाययोजना होत असतांना दुसरीकडे अंगणवाडीतील बालकांच्या वजनासाठी वापरण्यात येणारे वजन काटेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कुपोषणावर नियंत्रणासाठी उपाययोजना होत असतांना दुसरीकडे अंगणवाडीतील बालकांच्या वजनासाठी वापरण्यात येणारे वजन काटेच तकलादू असल्याची बाब सदस्यांन जिल्हा परिषद सभागृहात लक्षात आणून दिली. सदोष आणि हलक्या प्रतीचे वजनकाटे खरेदी करणा:यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, माहिती घेवून कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सर्व विषय समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या विषयांवर चर्चा करतांना सदोष वजन काटय़ाचा विषय निघाला. सदस्य विश्वनाथ वळवी यांनी दुर्गम भागातील अनेक अंगणवाडय़ांमधील वजन काटे हे सदोष असल्याचे सांगितले. मी स्वत: माङया मुलाला घेवून गेलो असता वजनकाटा बंद आढळला. अतिशय तकलादू आणि सदोष वजनकाटे अंगणवाडय़ांना पुरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. इतर सदस्यांनी देखील त्याला दुजोरा दिला. सदस्यांनी वजनकाटाच सभागृहात सदस्यांना दाखविण्यासाठी आणावा अशी मागणी केली. वजनकाटा आणल्यानंतर त्यावर पुन्हा चर्चा झडली. एमआरपी 3,375 इतकी आहे. बाजारात हेच वजनकाटे 500 ते हजार रुपयांमध्ये मिळतात.परंतु संबधीत विभागाने ठेकेदाराला यात पोसले असल्याचा आरोपही करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी माहिती घेवून कारवाईचे निर्देश दिल्यावर विषय थांबविण्यात आला.वस्ती शाळा शिक्षकांचा प्रश्नवस्ती शाळा शिक्षकांनी कायम सेवेत सामावून घेण्यासाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यावर सदस्य दिलीप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. 26 वस्ती शाळा शिक्षकांचा प्रश्न दोन वर्षापासून अधांतरीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी शासनाकडून नस्ती प्रस्तावीत असल्याचे सांगून शासन मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले, शासनाने आता नव्याने शैक्षणिक पात्रतेच्या अटी घालण्यात आल्या आहेत. जे पात्र नसतील त्यांना काढून टाकण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगितले.डॉक्टरांचा प्रश्नअनेक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टर नाहीत. त्यामुळे शव विच्छेदन देखील होत नाही. त्यामुळे मोठी हाल होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे अध्यक्षा रजनी नाईक यांनी सांगितले. खापर आरोग्य केंद्रात डॉक्टर राहत नसल्याचे आरोप यावेळी करण्यात आला. संध्या पाटील यांनी देखील प्रश्न उपस्थित केला. एमबीबीएस डॉक्टर भरती करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डीएचओ यांनी सांगितले.महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत युवकांना व युवतींना कराटे प्रशिक्षणाची योजना आहे. ही योजना कागदावरच असल्याचा आरोप सदस्यांनी केला. प्रशिक्षणाथींना ड्रेस देखील दिल्याचे सांगण्यात येते. परंतु किती आणि कुठे खरेदी झाली. प्रशिक्षण खरेच झाले का? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रितसर पहाणी करूनच संबधीत एजन्सीचे बील काढण्याच्या सुचना दिल्या.