शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीवरील ‘भार’ वाढला़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 12:41 IST

सुरत-भुसावळ मार्गाचे दुहेरीकरण : रेल्वेच्या अनियमिततेचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुरत-भुसावळ मार्गावर होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे परिणामी प्रवाशांचा भार आता एसटी बसेसवर वाढताना दिसून येत आह़े सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आह़े त्यामुळे या मार्गावर धावणा:या चार गाडय़ांचे शेडय़ुल्ड रद्द करण्यात आले आह़े त्यात, सायंकाळी नंदुरबार येथून असलेली अमरावती एक्सप्रेस, रात्री 11 वाजता असलेली भुसावळ-सुरत पॅसेंजर, तसेच रात्री साडे नऊ वाजेची सुरत-भुसावळ, रात्री चार वाजता असलेली भुसावळ-सुरत व सुरत-भुसावळ या गाडय़ा रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या़ तसेच अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस, हावरा या गाडय़ाही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने यामुळे प्रवाशांचे हाल होत होत़े याबाबत नंदुरबार येथील रेल्वेस्थानक प्रबंधक बी़एल़ मंडल यांच्याशी संवाद साधला असता, मंगळवारपासून सर्व गाडय़ा नियमित वेळेनुसार धावणार असल्याचे त्यांनी सांगितल़े  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची सेवा काहीशी  विस्कळीत झाल्याने नंदुरबार ते भुसावळ दरम्यानच्या मार्गावर प्रवास करणा:या प्रवाशांकडून पर्याय म्हणून एसटी बसेसचा वापर करण्यात येत आह़े यामुळे याचा अतिरिक्त भार एसटी बसेसना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आह़े सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करीत असल्याने प्रवासी संख्येत अधिकच  भर पडत असल्याचे चित्र दिसून येत आह़ेएक्सप्रेस झाल्या पॅसेंजर.दोंडाईचा ते पाळधी दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून नंदुरबार ते दोंडाईच्या या मार्गावरील दुहेरीकणाचे काम अद्याप करण्यात येत आह़े त्यामुळे दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून संबंधित रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या़ तर ज्या रेल्वेगाडय़ा सुरु ठेवण्यात आल्या होत्या त्यादेखील ब:याच छोटय़ा-छोटय़ा रेल्वे स्थानकावर  बराच वेळ थांबून असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ सध्या सणासुदीचे दिवस असल्याने हजारोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेचा वापर करीत असतात़ प्रवाशांचा पैसा व वेळ दोन्हीही वाचत असल्याने प्रवाशांकडून सर्वाधिक पसंती ही रेल्वेलाच देण्यात येत असत़े परंतु काही दिवसांपासून रेल्वेफे:या अनियमित असल्याने प्रवाशांना तासन्तास रेल्वे स्थानकावर वाट बघावी लागत आह़े त्यामुळे याला पर्यायी म्हणून प्रवाशांकडून एसटी बसेसना पसंती देण्यात येत असल्याचे चित्र नंदुरबारात दिसून येत आह़े दरम्यान, सोमवारीसुध्दा रेल्वेफे:या अनियमित असल्याने प्रवाशांची गर्दी बसस्थानकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े यामुळे याचा  भार बसेसवर दिसूनही येत आह़े नंदुरबार-धुळे, नंदुरबार-जळगाव आदी बसेसमध्ये प्रवाशांची मोठय़ा संख्येने गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े प्रवासी वाहतुकीमुळे एकीकडे परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत असली तरी अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांची मात्र यातून गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े बसफे:याची वाढ करावीदरम्यान, सणासुदीमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता परिवहन विभागाकडून जादा भारमान असलेल्या मार्गावरील बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात आली आह़े नंदुरबार-धुळे, नंदुरबार-जळगाव नंदुरबार-शिरपूर तसेच नंदुरबार दोंडाईचा आदी मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असत़े त्यामुळे साहजिकच या मार्गावर अधिकच्या बसफे:या होणे गरजेचे आह़े या मार्गावर प्रवाशांचे जादा भारमान असल्याने यातून परिवहन महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात    येत असत़े त्यामुळे याकडे परिवहन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आह़े