शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात पार पडले बॅण्डविना लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे पालन करीत बॅँडविना लग्न पार पाडणाऱ्या वधू व वर नित्यांचा सत्कार करण्यात आला.समाज एक असला तरी समाजातील बहुतांश कुटुंब हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. अशा कुटुंबांना मुला-मुलींचे लग्न जुळवून देण्यासाठी करावा लागणारा अनावश्यक खर्च परवडत नाही. त्यासाठी कुटुंबाला कर्जबाजारी देखील व्हावे लागते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी माळी समाजाने मागील महिन्यात सभा घेत लग्नातील अनावश्यक खर्च कमी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यात लग्नाच्या आधी बॅँड न बाजविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.समाजाच्या या निर्णयाचे पालन करीत तळोदा शहरातील चेतना अजित पवार व परेजकुमार प्रभाकर टवाळे यांचे लग्न ठरलेल्या वेळेतच पार पडले. परंतु हे लग्न लावतांना वधू व वरपित्यांकडून बॅँडचा फारसा अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे समाजामार्फत घेण्यात आलेल्या ठरावानुसार दोन्ही मंडळींकडून या लग्नात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्णयाचे अन्य समाजाकडूनही कौतुक करण्यात आले होते. या लग्नाच्या माध्यमातून समाजाने घेतलेल्या निर्णयांचे पालन केले म्हणून वधू व वरपित्यांचा माळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, लक्ष्मण माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, व्यवस्थापक संजय चौधरी आदी उपस्थित होते.