शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जवानांवरील हल्ल्याने नंदुरबारात संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:36 IST

कडकडीत बंद : प्रतिकात्मक पुतळे जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली

नंदुरबार : जम्मू-कश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनताफ्यावर झालेल्या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले़ या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शंभरटक्के कडकडीत बंद पाळण्यात आला़ विविध ठिकाणी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली़गुरुवारी जम्मू-काश्मिर येथील पुलवामा येथील राजमार्गावरुन जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला़या घटनेत चाळीसहून अधिक जवान शहीद झाले आहे़ याचे पडसाद राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर उमटताना दिसून येत आहे़ या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नागरिक शनिवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले़ नंदुरबारात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला़ यासह अक्कलकुवा, तळोदा आदी ठिकाणीही नागरिक, व्यापाऱ्यांनी बंदत सहभाग घेतला होता़ नंदुरबारात ठिकठिकाणी पाकिस्तानचे प्रतिकात्मक पुतळे तसेच ध्वज जाळण्यात आले़ पाकिस्तान मुर्दाबाद, जब तक सुरज चाँद रहेगा भारत तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात आल्या़प्रतिकात्मक पुतळ्याचे दहननंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात नागरिकांकडून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन करण्यात आले़ भारतीय सैन्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युंत्तर देण्याची वेळ आली असून पाकिस्तानात घुसून शस्त्रूला ठार करा अशा तीव्र भावना तरुणांकडून व्यक्त करण्यात येत होत्या़व्यापारी संकुले कडकडीत बंदनंदुरबारात सकाळपासून नागरिक तसेच व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला होता़ संपूर्ण दिवसभर व्यापारी संकुलने बंद होती़ ऐरवी वर्दळीमुळे गजबजलेले रस्ते शनिवारी ओस पडले होते़ सराफा बाजारातदेखील शुकशुकाट बघायला मिळाला़शहरात चौकाचौकात शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले होते़ शहीदांचे हे बलिदान व्यर्थ न जावो अशीच आर्त हाक सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत होती़विविध संघटनांचा बंदला प्रतिसादविविध संघटनांकडून नंदुरबार बंदला प्रतिसाद देण्यात आला होता़ दुकाने बंद करा अशी सांगण्याची वेळदेखील आली नाही़ सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे बंदत सहभाग घेतला होता़ त्याच प्रमाणे सर्व व्यापºयांकडून शहरातून रॅली काढण्यात आली होती़ शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कँण्डल मार्च काढण्यात आला होता़ यात, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता़ नंदुरबारातील शाळा, महाविद्यालयांमध्येही शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ नंदुरबार शहरात असलेले सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले होते़ शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला होता़