शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

41 कोटी खर्चासाठी वाहून गेले 500 कोटी रुपयांचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:47 IST

तापी उपसा योजना : दरवर्षी वाहून जाते 82 कोटी रुपयांचे पाणी

ठळक मुद्देबॅरेजेसनिहाय जलसाठा प्रकाशा बॅरेज- 62.11 दशलक्ष घनमीटर सारंगखेडा बॅरेज- 91.82 दशलक्ष घनमीटर सुलवाडे बॅरेज- 75.82 दशलक्ष घनमीटर दरवर्षी तिन्ही बॅरेजेसमध्ये एकूण होणारा साठा- 229.75 दशलक्ष घनमीटर दरवर्षी होणारे बाष्पीभवन (अंदाजित)- 34.46 दशलक्ष घनमीटर

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी शासनाने 600 कोटींहून अधिक खर्च करून तापी नदीवर बॅरेजेस बांधले असले तरी हे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी अद्यापही सुविधा झालेली नाही. त्यासाठी तापीवरील उपसा योजना पुनर्जीवनासाठी 41 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असले तरी त्यालाही विलंब होत असल्याने गेल्या सात वर्षात तब्बल 500 कोटी रुपये किमतीचे पाणी गुजरातमध्ये वाहून गेले आहे.तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. या नदीची लांबी 724 किलोमीटर असून त्याचा कॅचमेंट एरिया 65 हजार 145 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 79 टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्रात असून मध्य प्रदेशात 15 टक्के व गुजरातमध्ये केवळ सहा टक्के आहे. तापी खो:यातील एकूण 192 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाटय़ाला असून त्याचा करार झाला असला तरी अद्याप महाराष्ट्र आपल्या हिश्श्याच्या पाण्याचे नियोजन करू शकलेले नाही. त्यासाठी तापी नदीवर बॅरेजेस बांधले असले तरी त्यात केवळ पाणीसाठा होत आहे. हे पाणी शेतीसाठी वापराला येत नसल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. परिणामी हे पाणी एकतर गुजरातमध्ये वाहून जाते व त्यातील काही हिश्श्याचे बाष्पीभवन होते.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा, सारंगखेडा व सुलवाडे हे तीन बॅरेजेस बांधण्यात आले असून त्यात 2007 पासून पाणी अडविले जात आहे. या तिन्ही बॅरेजेसमध्ये सध्या 229.75 दशलक्ष घनमीटर पाणी अडविले जाते. हे पाणी साधारणत: ऑक्टोबर महिन्यात अडविण्यात येते. त्यापैकी साधारणत: 34.46 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. शिवाय काही शेतक:यांनी स्वत: आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी व्यवस्था केल्याने या शेतक:यांकडून साधारणत: 30.51 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो, असा प्राथमिक अंदाज आहे. बाष्पीभवन व शेतक:यांचा वापर होणारे पाणी सोडल्यास 164.78 दशलक्ष घनमीटर पाणी केवळ मृतसाठा म्हणूनच राहतो. ते पाणी पावसाळ्यापूर्वी सोडून देण्यात येते. त्यामुळे त्याचा फायदा गुजरातला होतो.एकूणच चित्र पाहिल्यास तापी नदीतील साधारणत: 164 दशलक्ष घनमीटर पाणी हे वापराअभावी दरवर्षी वाहून जाते. त्या पाण्याची अंदाजित किंमत लक्षात घेतल्यास त्याची सरासरी किंमत 82 कोटी रुपयांर्पयत होते. गेल्या आठ वर्षापासून हे पाणी वाहून जात आहे. त्याची किंमती ही 500 कोटींपेक्षा अधिक होते.जर तापीवरील उपसा योजना पुनर्जीवनाचे नियोजन वेळेवरच झाले असते तर या पाण्याचा वेळीच उपयोग जिल्ह्यातील शेतक:यांना झाला असता. सद्यस्थितीत या भागातील 22 उपसा योजनांचा पुनर्जीवनासाठी शासनस्तरावरून प्रक्रिया सुरू आहे. याबाबत 2014 पासून त्याला प्राथमिक मंजुरी मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी 41 कोटी रुपयांची मंजुरीही दिली आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून ही प्रक्रिया लांबत आहे. सध्या प्राथमिक स्तरावर कामाला सुरुवात झाली असली तरी ती पूर्णत्वास कधी येईल याबाबत आज तरी अनिश्चितता आहे. त्यामुळे केवळ 41 कोटी रुपये खर्चासाठी 500 कोटींहून अधिक किमतीचे पाणी वाहून गेले आहे. त्यात दरवर्षी 82 कोटी रुपयांची भर होणार आहे.