शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले व  डबक्यातील पाणी आणावे लागते.नदीच्या पात्रात असलेल्या डबक्याकडून केलापाणी ग्रामस्थ पाणी आणतात. या डबक्यातच जनावरेही पाणी पितात. तेथून आणलेल्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवतात. त्यामुळे विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. या डबक्यातील पाणी ग्रामस्थ वापरण्यासाठी आणत असल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांसमोर समस्या निर्माण होते. उन्हाळ्याला दोन महिने शिल्लक असताना जलस्त्रोत आटत असल्याने चिंता व्यक्त केली जात    आहे. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्यामुळे           येथील पाणीटंचाई तीव्र झाली           आहे.जिल्ह्यातील सातपुडय़ात दुर्गम भागात आजही भौतिक सुविधा, पाणीटंचाई, रस्ते, दवाखाना, वीज आदी   सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्वी नदी-नाल्यांना बारामही पाणी वाहत असे. परंतु आठ-दहा  वषार्पासून पाऊस कमी कमी होत गेल्याने पाणीटंचाईचे प्रमाण वाढत आहे. नदी-नाले ओस पडत असून सातपुडय़ातील वनगावे, गावे, पाडय़ांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे.  तसेच भूगार्भातील पाणी पातळीसुध्दा खूप खोलवर गेल्याने हातपंप, विहीर, बोरवेल ओस पडत आहे. काही गावात नदी-नाल्यातील डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. केलापाणी गावात शासनाकडून पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली नाही. केलापाणी ग्रामस्थांना वर्षानुवर्षापासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने याठिकाणी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.