शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:28 IST

प्रशासनाकडून निविदा : मागणी वाढण्याची शक्यता, खाजगी टँकर चालकांचा धंदा तेजीत

नंदुरबार : तीव्र पाणी टंचाईच्या जिल्ह्यातील २० पेक्षा अधीक गावांमध्ये पुढील महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर पुरवठादारांकडून निविदा देखील मागविल्या आहेत. जवळपास १५ वर्षानंतर जिल्ह्यात टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, ज्या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहीत केल्या आहेत त्या देखील आटू लागल्याने अशा गावांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची भिषण स्थिती आहे. जवळपास २०० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.टँकर सुरू होणारजिल्ह्यात गेल्या १५ वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. भौगोलिक कारणांमुळे दरवर्षी केवळ धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा येथे उन्हाळ्याचे दोन महिने टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा देखील या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यात पाणी स्त्रोत नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला बिरुद लागले होते. परंतु यंदाचा दुष्काळ भिषण असल्यामुळे २० पेक्षा अधीक गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निविदा मागविल्या...टँकरने पाणी पुरवठा करण्याची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतीच निविदा देखील काढली आहे. वेगवेगळ्या लिटर क्षमतेच्या टँकरचे प्रस्ताव मागविले आहेत. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या त्या क्षमतेच्या टँकरची निविदा स्विकारण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.विहिरी, कुपनलिका आटल्याजिल्ह्यातील ६० पेक्षा अधीक गावांमध्ये खाजगी विहिरी व कुपनलिका अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता या गावांमधील अधिग्रहीत कुपनलिका आणि विहिरीही आटू लागल्या आहेत.त्यामुळे पुर्वी दीड ते दोन तास उपसा होणारे पाणी आता जेमतेम अर्धातासपर्यंत उसपा होत आहे. पुढील काळात ते देखील कमी होणार असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.वसाहतींमध्ये आधीपासूनच सुरूशहरालगत असलेल्या अनेक वसाहतींमध्ये जानेवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात होळ शिवार, वाघोदा शिवार, दुधाळे शिवारातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींमध्ये किमान ३०० ते ५०० रुपये प्रमाणे टँकर मागवावे लागत आहे. तालुक्यातील भालेर, तिशी, उमर्दे या गावांमध्ये देखील ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत.