शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांवर पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2017 00:34 IST

पाण्यासाठी भटकंती : अशुद्ध पाण्याचा वापर, उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीच्या सात पाडय़ांवर कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ज्या बंधा:यावर गुरे  पाणी पितात त्या पाण्याचा वापर ग्रामस्थ करीत आहेत. आहे. संबंधित विभागाच्या अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उन्हाळा सुरू होण्याअगोदरच उपाययोजना करण्याची मागणी होत असून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीतील डेमच्यापाडा, भेंढय़ावड, केवडीपाणी, धजापाणी, अंबापाणी, सातपिंप्री, मिठापूर आदी पाडय़ांवर 300 ते 450 आदिवासी कुटुंवांचे वास्तव आहे. हातमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. कन्साई गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही पाडे असल्याने येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्योत्तर काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या पाडय़ांच्या परिसरात नदी-नाले, तलावाचे अस्तित्व नसल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही भक्कम सुविधा उपलब्ध नाही. या पाडय़ांवरील प्रत्येक कुटुंबास शेतातून अथवा खोदलेल्या खड्डय़ांमधून पाणी उपसावे लागते. ढेमच्यापाडा येथे 75 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी एकच हातपंप आहे. या हातपंपावरही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच भेंडय़ावड येथे 25 कुटुंब आहेत याठिकाणीही एक हातपंप आहे. मात्र येथील हातपंप वनविभागाकडून बंद करण्यात आल्याने या कुटुंबांना जवळील रतनपूर येथून पाणी आणावे लागते.धजापाणी येथेही 40 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाण्यासाठी विंधन विहीर आहे. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी नाही. तसेच अंबापाणी येथे 80 कुटुंब राहात असून खाजगी विहीर आहे. याठिकाणी आरोग्याचाही प्रश्न गंभीर असल्याचे बोलले जाते. सातपिंप्री येथे 30 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाणी असून नसल्यासारखे असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येतो. मिठापूर येथेही हातपंप आहे मात्र तो नादुरुस्त असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकंदरीत, आदिवासी पाडय़ातील कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याकरिता जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट नाला बांधकाम करून पाण्याचा साठा होणार आहे. तसेच काही ठिकाणी मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणीपुरवठा जेमतेम असून हे पाणी गुरेढोरे पितात. त्याच पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हिवाळा संपण्यापूर्वी या पाडय़ांवरील नागरिकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा मनलेश जयस्वाल, मदन पावरा, जयराम पटले, लिंबा पाडवी, रमेश वळवी, कांतीलाल पावरा, भूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.     (वार्ताहर)कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत येणा:या सात पाडय़ांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या प्रशासनाने येत्या काही दिवसात सोडविली नाही तर या पाडय़ांमधील मतदार येणा:या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकतील.-लिंबा रामा पाडवी, ग्रामस्थ, डेमच्यापाडागुरेढोरे ज्या ठिकाणी पाणी पितात तेथील पाण्याचा वापर या पाडय़ांमधील ग्रामस्थांना करावा लागतो. पाणी समस्या न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल.    -मनलेश जयस्वाल