शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त हातपंपमुळे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:03 IST

लक्कडकोट व खर्डी येथील स्थिती : प्रशासनाचे तात्काळ उपाययोजनेचे आश्वासन

तळोदा : हातपंप दुरूस्तीबाबत वारंवार पंचायतीकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने पुरेशा पाण्याअभावी लक्कडकोट व खर्डी येथील ग्रामस्थांचे हाल होत आहे.दरम्यान या गावातील काही रहिवाशांनी सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी ना दुरूस्त हातपंप तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी उद्याच हातपंप दुरूस्ती पथक गावात पाठविण्याचे आश्वासन दिले.तळोदा तालुक्यातील खर्डीखुर्द ग्रामपंचायतीतील खर्डी व लक्कडकोट या गावांमध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी साधारण १६ हातपंप केले आहेत. त्यापैकी निम्मे हातपंप नादुरूस्त झाल्यामुळे पाच ते सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. जे काही सुरू आहेत त्यातूनही वाढत्या तापमानामुळे कमी पाणी निघत आहे. साहजिकच पुरेशा पाण्याअभावी येथील गावकºयांचे प्रचंड हाल होत आहे. आधीच या दोन्ही ठिकाणी विखुरलेली लोकवस्ती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणांच्या हातपंपावर पाणी आहे तेथे दूरवर जावून इतर रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असते. एवढे करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने खर्डी व लक्कडकोट येथील रहिवाशांनी सोमवारी तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी गावामधील सर्वच हातपंपांची चौकशी करून ही हातपंपे तातडीेने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. केवळ नादुरूस्त हातपंपामुळे आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावकºयांनी सांगितले.वास्तविक यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा वस्तुस्थितीमुळे पंचायतीने पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत सजग राहणे आवश्यक होते. मात्र तशी सजगता दाखविण्यात आली नाही. याउलट नादुरूस्त हातपंपाबाबत तोंडी तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष घालण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर ही हातपंप दुरूस्त न झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीदेखील या रहिवाशांनी केली. दरम्यान गटविकास अधिकारी खर्डे यांनी गावकºयांची तक्रार ऐकूण घेतल्यानंतर उद्याच दुरूस्ती पथक गावात पाठवून हातपंप दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले.या वेळी गावकºयांनी त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, तिरसिंग पाडवी, रेगला वसावे, कुवरसिंग वळवी, दिलीप वळवी, राकेश पाडवी, दिलवर पाडवी, युवराज पाडवी, रमेश वळवी, संभू वसावे, सिपा वळवी, देविसिंग वसावे, रेवा वळवी, गिबजी वसावे, विजय वळवी, राकेश वसावे, पांड्या वसावे, भिका तडवी आदींच्या सह्या आहेत.