शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेचा जलकुंभ ठरतोय जीवघेणा : काकर्दे येथील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:14 IST

जागोजागी तडे गेल्याने कोसळण्याची भिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : तालुक्यातील काकर्दे येथे उभारण्यात आलेला पाणी योजनेचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर आह़े यातून मोठी जीवितहानी होण्याची भिती व्यक्त होत असताना पंचायत समिती ग्रामपंचायतीकडून जलकुंभ तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा करत आह़े यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करत आहेत़  1 हजार 600 लोकसंख्या असलेल्या काकर्दे येथे 1999 मध्ये जलस्वराज्य योजनेंतर्गत जलकुंभ मंजूर करण्यात आला होता़ या जलकुंभात दिवसाला 10 हजार पाणीसाठा करून ते पाणी गावात पुरवण्याचे नियोजन होत़े परंतु पंचायत समितीच्या अभियंत्यांनी मनमानी करून उंचीवर जलकुंभ बांधून दिला होता़ यातून जलकुंभ कायम अर्धाच भरला जात होता़ आधी निकृष्ट असलेल्या या जलकुंभाला गळती लागून स्लॅबच्या सळ्या बाहेर आल्या आहेत़   जलकुंभ कधी कोसळेल याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी जलकुंभ तपासणीला यावे असे आमंत्रण शासकीय महाविद्यालयाच्या तज्ञांना देऊनही ते आलेले नाहीत़ तज्ञ येत नसल्याने अहवाल मिळालेला यातून ग्रामस्थांची चिंता वाढत असून जलकुंभ कोसळल्यास जबाबदार कोणास धरावे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत़ गावातील सर्वात उंच जागेवर हा जलकुंभ 1999 साली उभारण्यात आले होत़े उंचावर असलेल्या जलकुंभात पाणी जात नसल्याने गावात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली़ उन्हाळ्यात जलकुंभ पूर्णपणे कोरडा रहात असल्याचा प्रकार घडत होता़ विशेष म्हणजे पाणी चढवण्यासाठी लागणा:या मोटारींचा खर्च करूनही यश आलेले नव्हत़े या जलकुंभाच्या तळातून पाण्याची गळती होत असून रोज स्लॅबचे तुकडे पडत असल्याचे काकर्दे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े खंडेराव मंदिर परिसरात असलेल्या जलकुंभाच्या परिसरात मोठी लोकवस्ती आह़े यातील काँकिट किंवा जलकुंभच कोसळल्यास मोठी जिवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता़ यात ग्रामसभेत नवीन जलकुंभ उभारण्याचा ठराव होता़ या ठरावाला मात्र पंचायत समितीने शेरा मारून अभियांत्रिकी तज्ञांच्या तपासणी अहवालाची मागणी करून फेटाळून लावला़ यामुळे ग्रामपंचायतीने धुळे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संपर्क करून तपासणी करण्याचे सूचित केले होत़े