शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 25 प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:42 IST

पाणी पातळी गेली खोल : 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 45 टक्के साठा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांपैकी 25 प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पांपैकी विरचकमध्ये 30 टक्के तर रंगावली प्रकल्पात 44 टक्केर्पयत पाणीसाठा राहिला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा चढता राहत असल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रियेत वाढ झाल्याने देखील पाणी साठय़ावर परिणाम झाला आहे. दरम्यान, विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली असून उन्हाळी कापूस लागवडीवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्केर्पयत पाऊस झाला होता. परंतु अनियमित स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे त्याचा पाणीसाठा होण्यास काहीही उपयोग झाला नाही. नदी, नाले देखील जास्तकाळ प्रवाही होऊ शकले नाहीत. केवळ पिकांसाठी पावसारी सरासरी सहाय्यभूत ठरली. पाणीसाठाच होऊ शकला नसल्यामुळे यंदा मार्च अखेरच जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधीक प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला आहे.रब्बीवर परिणामजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाअभावी रब्बी पिकावर देखील त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा, गहू पिकांना पाण्याचे आवर्तने न मिळाल्याने त्यांच्या उत्पादनावर काहीसा परिणाम दिसून आला. जिल्ह्यात उन्हाळी पीक घेण्याचे प्रमाण फारसे नाही. ज्या आठ, दहा टक्क्यांवर उन्हाळी पीक घेतले जाते ते देखील यंदा पाण्याअभावी घेतले गेले नसल्याची स्थिती आहे.25 प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील जवळपास 25 प्रकल्प आजच्या स्थितीत कोरडेठाक पडले आहेत. कोरडे पडलेल्या व केवळ दहा टक्केच्या आत अर्थात मृत साठा शिल्लक असलेल्या पाणी प्रकल्पांमध्ये खापरखेडा, कोंढावळ, लंगडी भवानी, लोंढरे, शहाणे, गढावली, रोझवा, सिंगसपूर, उमराणी,  हळदाणी, खेकडा, नावली, सोनखडकी, कोकणीपाडा, पावला, शनिमांडळ, वावद, खडकी, खोकसा, मेंदीपाडा, मुगधन, रायंगण, सुलीपाडा, विसरवाडी, आंबेबारा, धनीबारा, खोलघर, शिरवाडे, ठाणेपाडा, वासदरा, वसलाय या प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पमध्यम प्रकल्पांमध्ये रंगावलीत 44 टक्के, विरचकमध्ये 30 टक्के, राणीपूरमध्ये 35 तर दरा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय सारंगखेडा बॅरेजमध्ये 35 टक्के तर प्रकाशा बॅरेजमध्ये 89.18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी विरचक प्रकल्पातील सद्य स्थितीत सर्वच पाणीसाठा हा नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आला आहे.उशाला पाणी, घशाला कोरडसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणी असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात ते सर्व पाणी सोडून द्यावे लागणार आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात नुसतेच अडवून ठेवलेले पाणी अशी स्थिती असून या भागातील नागरिकांच्या उशाला   पाणी आहे, मात्र घशाला कोरड  कायम असल्याची स्थिती दिसून येत आहे. उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीची कामे संथ गतीने सुरू आहेत. तापी-बुराई उपसा योजनेच्या कामाला गती नाही. त्यामुळे हे पाणी उपसाही करता येत नसल्याचे चित्र आहे.उन्हाळी कापूस लागवडप्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने जमिनीत देखील पाणी मुरण्याची प्रक्रिया झाली नाही. परिणामी बागायतदार शेतक:यांच्या विहिरी आणि कुपनलिकाच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक तर     घेतले गेले नाहीच आता मे महिन्यात होणारी कापूस लागवड देखील यंदा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जवळपास 11 ते 14 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कापूस लागवड केली जाते. यंदा पाणीच नसल्यामुळे दोन किंवा तीन हजार हेक्टरवरच उन्हाळी कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतक:यांना जूनमध्येच कापूस लागवड करावी लागण्याची शक्यता आहे.