शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणी व्यवस्थापन प्रत्येकाने शिकले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:49 IST

जलसाक्षरता परिषद : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे आवाहन, अधिकारी, कर्मचा:यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग इंच ना इंच जमिनीसाठी करून घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाऊस हे समिकरण मान्य केले तर नैसर्गिक प्रवाहातून येणारे पाणी त्या त्या ठिकाणी बांध घालून जमिनीत जिरवले पाहिजे असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलसाक्षरता सभेत बोलतांना केले.जिल्हा साक्षरता समिती, यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलसाक्षरता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.राजेंद्रसिंह बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, यशदाचे डॉ.सुमंत पांडे आदी उपस्थित होते.डॉ.राजेंद्रसिंह म्हणाले, प्रत्येकाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करणारी परिवर्तनवादी लोकचळवळ निर्माण करून पावसाचा पडणारा थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे या दृष्टीने प्रत्येकाने प्रय} करण्याची गरज आहे.  पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते, ते अडविले जात नसल्यामुळे ते थेट नदी, नाले, ओढे या माध्यमातून समुद्राला जावून मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही.  पूर्वीच्या काळी नद्या, नाले बारमाही वाहत होते. त्यामुळे पाणी अडविण्याची गरज राहत नव्हती. आता मात्र बारा महिन्यांपैकी अवघे दोन ते तीन महिनेच नद्या वाहतात. त्यामुळे मोठमोठे धरण, बंधारे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु एवढी मोठी धरणे आणि बंधारे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे बांधून त्यातून सिंचन वळविल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. शिवाय असे पाणी जमिनीत मुरण्यास देखील मदत होते. परिणामी जमिनीतील पाणी पातळी वाढते. राज्यासह जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर काही भाग चांगल्या पावसाचा तर काही भाग कमी पावसाचा आहे. त्याला कारण मानवनिर्मित संकटेच आहेत. पाण्याचा अधीक उपसा, कमी झालेली वनराई, लहान, लहान बांधांची कमी झालेली संख्या आणि पावसाचा पाण्याचा उपयोग न करण्याचे धोरण ही कारणे प्रामुख्याने नमुद करता येतील असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, जलसाक्षरता योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलदूत, जलनायक, जलप्रेमी व जलकर्मी तयार करावयाचे असून यासाठी शालेय विद्याथ्र्याचा सहभाग आवश्यक राहणार आहे. लहान वयातच    मुलांवर चांगले संस्कार होतील हा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.जलसाक्षरता केंद्र यशदाचे डॉ.सुमंत पांडे यांनी जलसाक्षरता कृती आराखडा, प्रशिक्षण व संनियंत्रण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे माहिती दिली. कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी यांनी यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.