लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आह़े या भागात बहुसंख्य टय़ुबवेल 200 फुटार्पयत आहेत़ परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याही पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े अद्याप एप्रिल - मे महिना काढायचा असताना मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पिकांना पाणी देण्याची चिंता पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात ऊस, केळी, पपई, कापूस, हरभरा,गहू अशी बागायती पिक घेण्यात आलेली आहेत़ सधन शेतक:यांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आह़े परंतु इतर शेतक:यांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आह़े पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे स्पष्ट झाले होत़े परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आह़े त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आह़े टरबूज पिकावर दुष्परिणामदरम्यान, तळोदा परिसरात मोठय़ा प्रमाणात टरबूज व डांगर पिकाची लागवड करण्यात आली आह़े परंतु सातत्याने या ठिकाणी ढगाळ हवामानाचा परिणाम पिकावर जाणवत आह़े त्यामुळे यावर कृषी विभागातील अधिका:यांनी शेतक:यांना मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े पिण्याच्या पाण्याचेही वांधेग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े यासाठी मजुरांना पाण्याच्या शोधात रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े चा:यासाठीही होताय हाल.दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चा:याचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चा:याच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचे अद्याप बरेच दिवस घ्यायचे आह़े त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आह़े सध्या तापमानातही वाढ होत आह़े त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आह़े
बोरद परिसरात पाणी पातळीने गाठला तळ, अनेक गावांमध्ये टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:53 IST