लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : 600 मीटर डोंगरावरून खाली पायपीट करत नदीतील कुंडाचे अस्वच्छ पाणी नेऊन तालुक्यातील केलापाणी गावातील नागरिक आपली तहान भागवित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान तेथील मंजूर विहिरींसाठीदेखील बुधवारी गावक:यांनी गटविकास अधिका:यांना साकडे घालून पाण्याची भीषण टंचाई सोडविण्याची मागणी केली आहे.सातपुडय़ातील दुर्गम भागातील केलापाणी हे छोटसं गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण 400 आहे. हे गाव खर्डी बुद्रूक या ग्रामपंचायतीत येते. सातपुडय़ाच्या डोंगरावर हे गाव वसलेले आहे. त्यामुळे तेथे धड रस्तेही नाही. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. एवढेच नव्हे तर साध्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासूनदेखील ते वंचित आहेत. गावात पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नसल्याने गावातील ग्रामस्थ 600 ते 700 मीटर डोंगराखाली वाहना:या नदीचे पाणी वर्षभर पीत असतात. आता तर नदीचा प्रवाह आटला आहे. ठिक-ठिकाणी साचलेले डबके व साधारण खोल कुंडातील पाण्याचा वापर करीत आहे. परंतु पाण्यासाठी महिलांना आपला जीवमुठीत धरून डोंगरावरून खाली व पुन्हा डोक्यावर हंडा घेवून डोंगर चढावा लागत आहे. एवढी कसरत करूनही शेवटी त्यांना अस्वच्छ पाण्याने आपली तृष्णा भागवावी लागत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक पाण्याची एवढी भीषण टंचाई गावात असतांना त्यावर उपाययोजनांबाबत पंचायत समितीकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप गावक:यांनी केला आहे. कारण गेल्यावर्षी सुद्धा या प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र थातूर-मातूर चौकशी करून गावक:यांचे समाधान करण्यात आले होते. वास्तविक याठिकाणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विंधन विहीर मंजूर केली आहे. परंतु अजूनही या विभागाला विहीर खोदण्याचा मुहूर्त सापडत नसल्याचा आरोप केलापाणीवासीयांनी केला आहे. या उलट गावक:यांनीच श्रमदानातून विहिरीचे खोदकाम केल्याचे गाकरी सांगतात. 15 ते 20 फुट खोल खोदलेल्या या विहिरीस पाणी लागले होते. तथापि ते तीव्र उन्हामुळे कमी झाले आहे. गावातील पाणञयाचा तीव्र प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी गावक:यांनी बुधवारी पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी खर्डे यांची भेट घेतली होती. त्यांनी चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलवरसिंग वळवी, तुळशिराम पाडवी, विनोद वळवी, बाज्या वळवी, लालसिंग पाडवी, सिंगा नाईक, मगन नाईक, सिपा पाडवी, वेलजी पाडवी, कांतीलाल पाडवी, रित्या पाडवी, वालजी वसावे, जेलसिंग वळवी, रमेश पाडवी आदी उपस्थित होते.
केलापाणी येथे डोंगर उतरून आणावे लागते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:01 IST