शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पिकांसह पाणीपुरवठय़ालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 11:03 IST

सारंगखेडा बॅरेज : दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याची गरज

ठळक मुद्देबॅरेजचे दरवाजे बंद करण्यासंदर्भात मुख्य कार्यालयाच्या वरिष्ठ अधिका:यांमार्फत सूचना आलेल्या नाहीत व नियमाप्रमाणे 15 सप्टेंबरशिवाय दरवाजे बंद करता येत नाहीत. तसेच दरवाजे दुरुस्ती व ऑईल ग्रिसींगचेही काम सुरू आहे. परंतु आम्हाला शेतकरी, ग्रामस्थ किंवा ग्रामपंच

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने बॅरेज व नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणा:या ज्ॉकवेल व इलेक्ट्रीक मोटारींना पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची कसरत सुरू आहे.सारंगखेडा व परिसरात जून महिन्यात 7 व 8 तारखेला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र श्रावण सरीच बरसल्या. अद्यापही या भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा आतार्पयतच्या पावसाळ्यात कोणतेही नदी-नाले वाहून निघाले नाहीत. त्यातच 15 दिवसांपासून सारंगखेडा बॅरेजचे सर्व 26 दरवाजे उघडण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी           स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात जोरदार पाऊस नसल्याने बागायती व कोरडवाहू क्षेत्रातील पिके               धोक्यात आली आहेत. अनेक शेतक:यांनी तापी नदीवर इलेक्ट्रीक मोटारी ठेवून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. मात्र तापी नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी उपलब्ध होत नाही. बागायती  पिकांना पाणी देणे आवश्यक असताना पाणी मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडण्याच्या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतक:यांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीतापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सारंगखेडा बॅरेजच्या साठवून ठेवलेल्या पाण्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र बॅरेजमध्ये व नदीपात्रात दरवाजे उघडल्यामुळे पाणीसाठा नसल्याने या गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर शेतक:यांना पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अध्र्या नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसमध्ये तरी थोडाफार पाणीसाठा व्हावा म्हणून पालकमंत्री रावल          यांनी संबंधित विभागांना तातडीने बॅरेजेसचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.