शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यांवर गाढवांवरून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:42 IST

एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते.

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी भागातील कुयरीडाबर (ता. तळोदा) गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तेथे गाढवांद्वारे पाणी पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने शोधला आहे. या पर्यायानंतरही गावाला दरडोई फक्त तीन लीटर पाणीपुरवठा होतो.

माणसांची त्यातून जेमतेम तहान भागते पण वापरासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे कुठून? असा प्रश्न येथील ग्रामस्थांपुढे पडला आहे.कुयरीडाबर हे सातपुड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रांगेदरम्यान वसलेले गाव. गावाची लोकसंख्या ३१० आहे. रापापूरपर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून मात्र पायीच उंच डोंगर चढून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाला पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. त्यातील एक विहीर भ्रष्टाचारात बुडाली तर दुसरी विहिरही कोरडी झाली. रविवारपासून गावाला गाढवांद्वारे पाणी पुरवण्याची अंमलबजावणी सुरू झाली.१७ गाढवे घेतली भाड्यानेपाणी पुरवठ्यासाठी १७ गाढव भाड्याने घेण्यात आले आहेत. गाढवांना ने-आण करण्यासाठी पाच मजूर आहेत. गाढवाच्या पाठीवर १५ लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवली जातात. तब्बल दोन तासानंतर ते कुयरीडाबरला पोहोचतात. प्रत्येक घरासाठी एक ड्रम दिला जातो. गावात एकूण ५६ घरे असल्याने दोन फेºया माराव्या लागतात.एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते. ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्तर निधीतून या योजनेसाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गावात ५९२ जनावरे आहेत. त्यांच्यासाठी पाणी व चारा नाही. शिवाय दैनंदिन वापरासाठी पाणी आणावे कुठून? त्याचे उत्तर कुणाकडेही नाही. 

महाराष्ट्रासाठी ही खरोखरच एक लाजिरवाणी बाब असून सरकार व प्रशासनाने कुयरीडाबरसारखे अजूनही असंख्य गावे आहेत. तेथील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे.-प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा.