शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:49 IST

नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारला शिवण नदीवरील ...

नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या प्रकल्पात अवघा 21 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय याच नदीवरील व विरचक प्रकल्पाच्या अलीकडील आंबेबारा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. परंतु या धरणातून शहराच्या एकूण पाणी पुरवठय़ापैकी केवळ 20 टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी दरवर्षी पालिका या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षित करीत असते.साठा घटतोय..विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. फेब्रुवारी महिन्यार्पयत या प्रकल्पात 50 टक्केर्पयत पाणीसाठा होता. परंतु यंदा तीव्र उन्हाळा असल्यामुळे आणि तापमानदेखील 40 पेक्षा अधिकच राहिल्याने पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाणी साठय़ात या तीन महिन्यात अर्थात मार्च ते मे दरम्यान घट झाली. सद्य स्थितीत जिवंत पाणीसाठा केवळ 15 टक्के असून त्यानंतर मृतसाठा    राहणार आहे. परंतु तोर्पयत दमदार पाऊस झाल्यास ब:याच प्रमाणात समस्या मिटणार आहे. सध्या जून महिना अर्धा संपला आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पाण्याची नासाडीशहरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्याचे मोल जनतेला कळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी भरल्यानंतर थेट गटारीत नळी सोडणे, झाडांना पाणी मारणे, टाकी भरूनही कॉक बंद न करणे, अंगणात, रस्त्यांवर पाणी शिंपडणे असे प्रकार होत आहेत. शिवाय अनेक भागातील नळांना तोटय़ा नसल्यामुळे पाणी पुरवठय़ाच्या कालावधित सर्रास पाणी वाहत असते. त्याबाबत पालिकेने वेळोवेळी जनजागृती करूनही उपयोग झाला नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे ज्या भागातील नळांना तोटय़ा नाहीत अशा भागातील नागरिकांना, नळधारकांना मोफत तोटय़ा पुरविण्यात आल्या होत्या, परंतु त्याचाही उपयोग जनतेने करून घेतला नाही.