युवकांमध्ये संघटन व परस्पर सहकार्य यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे जात आहे. यात गावातल्या अशिक्षित युवकापासून ते पदविका, पदवीधर मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तरुण अतिशय उत्साहाने सकाळ झाली की व्हाॅटसॲप ग्रुपवर एकमेकांना मेसेज टाकून जमा होतात आणि बोडक्या पर्वत रांगावर कुदळ, फावडी व सीसीटीच्या खुणांसाठी दोर -चुना घेऊन निघतात. युवांच्या श्रमाने दगडी पहाडालाही चरे पडतात तेव्हा घामाच्या धारांनी चिंब झालेले त्यांचे चेहरे एक नव्या श्रमपूर्तीच्या आनंदाने अधिक प्रफुल्लित होतात. अशा पद्धतीने गावातल्या या श्रमदानाची कहाणी नवा इतिहास लिहीत आहे असे गावचे ज्येष्ठ नागरिक मेरसिंग लुल्या पावरा यांनी सांगितले.
प्रा.डाॅ. एच. एम. पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी पाण्यासोबत गावात तीन गोण्या भरून प्लास्टिकच्या बाॅटल्स, रॅपर, गुटख्याचे पाऊच जमा करून प्लास्टिक कचरा मुक्त कुकलट गावचा संकल्प केला आहे. शाश्वत विकासाकडे गावाची पावलं पडत आहेत आणि हा सकारात्मक बदल फक्त गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य आहे, असे प्रतिपादन प्रा.डाॅ. एच. एम. पाटील यांनी केले आहे.