शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींनी तळ गाठल्याने ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:51 IST

कोळदे शिवार : विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कोळदे परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता़ आता एप्रिलमध्ये विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी नसल्याची भिषण स्थिती निर्माण झालेली आहे़ गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे़या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ या भागात बहुसंख्य ट्युबवेल ५०० ते ७०० फुटापर्यंत आहेत़ परंतु दोन महिन्यांपसाून त्याही आटल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ अद्याप मे महिना काढायचा असताना आतापासूनच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़पिकांना पाणी देण्याची चिंतापाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येथील शेतकºयांनी जे काही खरिपाची थोडीफार पिक घेतली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे़ या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ सधन शेतकºयांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आहे़ परंतु इतर शेतकºयांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आहे़ मागील वर्षी ऐन पावसाळ्यातदेखील येथील पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते़ परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आहे़ त्यामुळे पिक जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे़पिण्याच्या पाण्याचेही वांधेग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आहे़ या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ पाण्याच्या शोधात मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आहे़ अशी वस्तूस्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आहे़ परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करुन येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे़चाºयासाठीही होताय हाल..पाणी व चाराटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ येथील पशुपालकांना चाºयासाठी इतरत्र वणवण करावी लागत आहे़ पशुपालकांसमोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाºयाचा प्रश्न निर्माण होत असतो़ त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतमजुर पाणी व चाºयाच्या विवंचनेत फिरत असतात़ उन्हाळ्याचा अद्याप मे महिला बाकी आहे़ त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सध्या तापमानातही वाढ होत आहे़ त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये पिकांचे मात्र नुकसान होत आहे़