शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी शुद्धीकरणाची योजना आकारास

By admin | Updated: February 15, 2017 23:10 IST

राज्यातील पहिलीच पालिका : चंद्रकांत रघुवंशी यांची दावा

नंदुरबार : सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते शेतीसाठी उपयोगात आणण्याची योजना राबविणारी नंदुरबार ही राज्यातील पहिलीच पालिका राहणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील विविध विकास कामांसदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रघुवंशी यांनी सांगितले, नंदुरबार शहरात भूमिगत गटार योजना राबविण्यात आली आहे. यातून निघणारे सांडपाणी हे एका ठिकाणी गोळा करून तेथे त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी सी.टेक.च्या धर्तीवर मल निस:रण  केंद्र उभारण्यात आले आहे. दोन भागातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने सांडपाणी नळवा शिवारातील या केंद्रात येणार आहे. त्यासाठी शहरभरात एकूण 145 कि.मी.ची भूमिगत गटार टाकण्यात आली    आहे. राज्यभरात केवळ नंदुरबार पालिका हीच एकमेव पालिका अशा प्रकारची योजना राबविणारी ठरणार आहे. आतार्पयत केवळ महापालिकांमध्येच ही योजना राबविण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याअंतर्गत योजनेचे काम सुरू असून पूर्ण झाल्यावर पालिका ती चालविणार आहे.स्व.बाळासाहेबांचे नावनंदुरबार शहरात जलतरण तलाव नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव उद्घाटनानंतर बंदच आहे. खाजगी तत्त्वावर एक सुरू झाला आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात जलतरण तलावाचा लाभ घेता यावा व शहरात उत्तम जलतरणपटू घडावे यासाठी पालिकेतर्फे ऑलंम्पिक खेळाच्या धर्तीवर जलतरण तलावाचे बांधकाम सुरू आहे. या तलावाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. तसा ठरावही पालिकेत करण्यात आला आहे. याशिवाय सी.बी.गार्डनमध्ये मिनी वॉटरपार्कदेखील तयार करण्यात येत आहे.पालिका निवडणुकीची तयारीकाँग्रेसतर्फे पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मार्च अखेर सर्वच विकास कामे पुर्ण करणार आहे. मुख्यमंत्रीसह इतर मंत्री, नेतेगण यांच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटने करण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यापासून प्रत्यक्षात निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. विरोधक कोण राहील, कसा राहील याची कल्पना नाही. परंतु शहरवासीयांच्या विश्वासावर, बळावर आपण या निवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचेही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.