या वेळी बक्षीसपात्र जनावरांच्या निवडीकरीता नंदुरबार पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी दोन तासात परीक्षण करीत निकाल घोषित करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित पारितोषिक विजेत्या पशुपालकांकडून आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्सदेखील घेण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यावर बक्षिसाची रक्कम जमा न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तळोदा पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी सावित्रीबाई खर्डे यांचे निधन झाल्याने त्यांच्या सहीअभावी पैसा निघू शकला नाही. हा पैसा २२ जून २०२० लाच तळोदा पंचायत समितीकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित पशुपालकांचा पैसा त्यांना लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित त्यांच्या खात्यावर रक्कम अदा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.