लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून निर्माण होणारा धोका लक्षात न घेता तोंडाला मास्क न बांधता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या १५ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाभरात त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. शहाद्यातील जामा मशीद परिसरातत फिरणारे फारूख मुस्तफा शहा, फरीद मुस्ताक शाह रा.बेलदार गल्ली यांच्याविरुद्ध, नंदुरबारात दंडपाणेश्वर मंदीराजवळ दिलीप धनाजी चौधरी, तळोद येथे भाजी मंडई चौकात सुमेर सादीक अरब व अक्षय रामा तडवी, दिपक केशवलाल चावडा, इश्वर भिका सूर्यवंशी, रवींद्र रामचंद्रसिंग पुरोहित, यांच्यावर, धडगाव येथे बसस्थानक परिसरात गिज्या दामज्या वळवी, तळोदा रोडवर रघुनाथ रामजी पाडवी, मोलगी रोडवर आकाश सुमेरसिंग पाडवी, अलि सायसिं पाडवी यांच्याविरुद्ध कारवाइ करण्यात आली.मोलगी येथे बाजार चौकात विशाल अमरसिंग तडवी, सागर राजू वळवी, राकेश आमश्या वसावे, विजय फोत्या वसावे यांच्यावर त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क लावणे आवश्यक आहे. आपल्यामुळे इतरांना व इतरांमुळे आपल्याला त्रास होणार नाही या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेतली तर अशा कारवाई करण्याची वेळ येणार नाही असे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
विना मास्क फिरा आणि कारवाईला सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:32 IST