शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 1 लाख लाभार्थीना आवासची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीचे 2011 साली सव्रेक्षण झाले होत़े या सव्रेक्षणाचा आधार घेत, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे वाटप सुरू असूज आजवर केवळ 15 हजार 540 लाभार्थीना या योजनेचा थेट लाभ मिळाला आह़े अद्यापही 1 लाख 3 हजार लाभार्थीना लाभाची प्रतीक्षा असून त्यांची फिरफिर सुरू आह़े 2014 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीचे 2011 साली सव्रेक्षण झाले होत़े या सव्रेक्षणाचा आधार घेत, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे वाटप सुरू असूज आजवर केवळ 15 हजार 540 लाभार्थीना या योजनेचा थेट लाभ मिळाला आह़े अद्यापही 1 लाख 3 हजार लाभार्थीना लाभाची प्रतीक्षा असून त्यांची फिरफिर सुरू आह़े 2014 पूर्वी इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुलांचा लाभ देण्यात येत होता़ या योजनेच्या याद्यांचा आधार घेत केंद्र शासनाने 2015 पासून प्रधानमंत्री आवास योजनेला सुरुवात केली़ यानुसार लाभार्थींना 1 लाख 20 हजार रुपयात घरकूल देण्यास सुरुवात करण्यात आली़ नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख लाभार्थीच्या याद्या थेट केंद्राकडे हस्तांतरीत होऊन त्यांचे अ, ब़, क आणि ड असे वर्गीकरण झाल़े यातील सध्या ब यादी सुरू असून 11 हजार लाभार्थीना लाभ मिळाला आह़े आवास योजनेंतर्गत 2016-17 या वर्षात 5 हजार 22 घरकुलांची निर्मिती सर्व सहा तालुक्यात करण्यात आली होती़ यात अक्कलकुवा 976, धडगाव 206, नंदुरबार 779, नवापूर 1 हजार 234, शहादा 1 हजार 190 तर तळोदा तालुक्यात 637 घरे बांधण्यात आली़ 2017-18 या वर्षात मात्र घरांसाठी निधी देण्याची प्रक्रिया बराच काळ रेंगाळल्याने केवळ 518 पूर्ण झाली आहेत़ यात अक्कलकुवा 95, नंदुरबार 49, नवापूर 150, शहादा 24 तर तळोदा तालुक्यात 3 घरकुल पूर्ण झाल्याचा अहवाल आह़े चालू आर्थिक वर्षात केंद्रशासनाकडून याद्यांनुसार लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने यंदा योजनेला कासवगती मिळाल्याचे सांगण्यात येत आह़े गत दोन वर्षात अक्कलकुवा 1 हजार 71, धडगाव 255, नंदुरबार 976, नवापूर 1 हजार 384, शहादा 1 हजार 214 तर तळोदा तालुक्यात 640 लाभार्थीची घरे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आह़े गेल्या वर्षात तीन टप्प्यात देण्यात येणारा घरकुलासाठीचा निधी यंदापासून पाच टप्प्यात मिळत असल्याने योजनेची वाताहत होत असल्याचे सांगण्यात आले आह़े इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात 2014 र्पयत 78 हजार लाभार्थीच्या याद्या पूर्ण होत्या़ या याद्यांनुसार 60 हजार लाभार्थींची घरकुलांची गरज पूर्ण झाली होती़ तर उर्वरित 18 हजार लाभार्थीना गेल्या तीन वर्षात घरकुल देणे प्रस्तावित असताना, या याद्या बाद ठरवत 2011च्या सव्रेक्षणानुसार 1 लाख 9 हजार 368 लाभार्थीचा समावेश असलेल्या याद्या ग्राह्य धरून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली़ ही योजनेला 3 वर्ष पूर्ण होऊनही केवळ पाच टक्के घरकुलांचे वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आह़े प्रधानमंत्री आवास योजना लागू झाल्यानंतरही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील 897 लाभार्थीना 2015-16 या वर्षात  इंदिरा आवास योजनेतून लाभ मिळाला आह़े यात अक्कलकुवा 88, धडगाव 20, नंदुरबार 242, नवापूर 256, शहादा 225 तर तळोदा तालुक्यातील 66 लाभार्थीना घरकुलांचा निधी मिळाला होता़ आवास योजनेमुळे शबरी आवास योजनेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र सध्या आह़े यात 2016-17 मध्ये केवळ 809 लाभार्थीना घर बांधण्यासाठी पैसे मिळाले यात अक्कलकुवा 82, धडगाव 18, नंदुरबार 217, नवापूर 254, शहादा 174 तर तळोदा तालुक्यात 64 लाभार्थीना शबरी आवासचा लाभ मिळाल्याची माहिती आह़े दरम्यान जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात कसूर करणा:या दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आह़े योजना सुरू झाल्यानंतर केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या याद्यांमधील लाभार्थीच्या खात्यावर तीन टप्प्यात 1 लाख 20 हजार रुपयांचे वितरण करण्यात येत होत़े पहिल्या टप्प्यात 30, दुस:या टप्प्यात 60 तर तिस:या टप्प्यात 30 हजार रुपयांचे वितरण करण्यात येत़े यात 2017-18 मध्ये बदल करण्यात येऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केंद्रीय स्तराऐवजी राज्यस्तरावरून वितरित करण्याचे नियोजन करण्यात आल़े यात पाच टप्प्यात लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे धोरण स्विकारण्यात आल़े यानुसार पहिल्या तीन टप्प्यात 30, चौथ्या टप्प्यात 20 तर शेवटच्या टप्प्यात 10 हजार रुपयांचे वितरण करण्याचे आदेश काढण्यात आल़े यामुळे घरकूल बांधकाम करणा:या लाभार्थीना अडचणींचा सामना करावा लागून घरबांधणीच्या कामांवर परिणाम झाला आह़े जिल्ह्यात सर्वच आवास योजनांची स्थिती डळमळीत असताना रमाई आवास घरकूल योजनेलाही ब्रेक लागल्याचे चित्र आह़े 2016-17 या वर्षात केवळ 88 लाभार्थीना घरकुलाची पूर्तता करण्यात आली आह़े यात अक्कलकुवा 6, धडगाव 2, नंदुरबार 25, नवापूर 2, शहादा 51 तर तळोदा तालुक्यात 2 लाभार्थीना घरकूल वाटप करण्यात आल़े ग्रामीण विकास यंत्रणेकडे तालुकास्तरावरून गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी तब्बल तीन हजाराच्यावर प्रस्ताव देण्यात आले होत़े