शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

एक खिडकीची उद्योजकांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 11:24 IST

उद्योग केंद्राचे दुर्लक्ष : उद्योग सारथी योजना बारगळली, उद्योजक नाराज

ठळक मुद्देबहुउद्देशीय खिडकी..
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उद्योग सुरू करण्यासाठी लागणा:या विविध परवाणग्या एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी दीड वर्षापूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात सुरू करण्यात आलेल्या एकखिडकी योजनेचा पुर्णपणे बोजवारा उडाला. सुरुवातीचे काही दिवस हा उपक्रम सुरळीत राहिला, नंतर मात्र कायमचा बंद पडला. त्यामुळे एक खिडकीचा काहीही उपयोग झाला नाही.जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी उद्योग सारथी योजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिका:यांना दिले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यामुळे उद्योग सुरू करतांना लागणारे विविध विभागांचे परवाने कमीत कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळतील. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाचा उद्योग सुरू करतांना किंवा निर्मिती अथवा सेवा प्रकल्प सुरू करतांना उद्योजकाला महावितरण, कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा, प्रदुषण नियंत्रण कार्यालय, बाष्पके संचालनालय अशा अनेक प्रकारच्या कार्यालयांकडून विविध परवाने प्राप्त करावे लागतात. मात्र ते मिळवितांना प्रत्येक कार्यालयाकडे व्यक्तीश: पाठपुरावा करावा लागतो. त्यात वेळेचा अपव्यय होतो. ते टाळण्यासाठीच उद्योगसारथी ही एक खिडकी संकल्पना तयार केली आहे.यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी किंवा क्षेत्र व्यवस्थापक, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक अधिकारी, बाष्पके संचनालनालयाचे सहसंचालक, कामगार आयुक्त, आरोग्य व औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, विशेष निमंत्रीत असे दहा सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. समितीची बैठक महिन्यातून एकदा किंवा आवश्यकतेप्रमाणे घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते. उद्योजकाला अनेक ठिकाणी अर्ज न करता एक खिडकीतच अर्ज द्यायचा आहे. उद्योग, कामगार, प्रदुषण नियंत्रण, महावितरण, बँकींग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगररचना, अन्न व औषध प्रशासन, कामगार विमा संचालनालय आदी विभागांच्या सेवा या एक खिडकीत मिळण्याचे निर्देश होते, परंतु खिडकीचा काहीही उपयोग झाला नाही.