शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

आरटीपीसीआर सुरू होऊनही वेटींग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाली, परंतु मायक्रोबॉयलॉजिस्टची कमतरता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरएनए वेगळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाली, परंतु मायक्रोबॉयलॉजिस्टची कमतरता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरएनए वेगळे करण्याचे उपकरण यांच्या अभावामुळे ही प्रयोगशाळा उद्घाटनानंतर तिसºया दिवशीही पुर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे. पुर्ण क्षमतेने अर्थात दररोज १२०० स्वॅब अहवाल तपासणीच्या कामास पुढील आठवडा उजाडणार आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ७१७ अहवाल वेटींगवर होते.नंदुरबारातील कोरोना अहवाल तपासणीस धुळे प्रयोगशाळेत लागणारा उशीर लक्षात घेता नंदुरबारातही अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी होत होती. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ही प्रयोगशाळा येथे मंजूर करून आणली. परंतु प्रत्यक्षात उपकरणे यायला आॅगस्ट उजाडला आणि प्रत्यक्षात प्रयोगशाळा सुरू होण्यास १५ आॅगस्ट उजाडला. साधारणत: दीड कोटी रुपये खर्च करून ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. परंतु प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचा अभाव आणि इतर तांत्रिक बाबी यामुळे या प्रयोगशाळेतील काम अद्यापही पुर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्वॅब अहवालांची प्रतिक्षा वाढतच चालली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तब्बल ६०० पेक्षा अधीक स्वॅब वेटींगवर राहत आहे. मंगळवारी दुपारी ही संख्या ७१७ पर्यंत गेली होती.१०० च्या आतच तपासणीसद्यस्थितीत आरटीपीसीआर प्रयोगशाळेत केवळ ५० ते १०० स्वॅब तपासणी होत आहे. नवीन सुरू झालेली प्रयोगशाळा, नवीनच प्रशिक्षीत असलेले कर्मचारी यामुळे सर्व काळजी घेऊन आणि खात्री करूनच स्वॅब तपासणी केली जात आहे. येथील अहवाल पडताळून घेतल्यानंतरच ते जाहिर करण्यात येत आहे. हळूहळू या ठिकाणी स्वॅब तपासणी वाढविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत पुर्ण क्षमतेने प्रयोगशाळेत तपासणी होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी दिली.स्थानिक कर्मचाºयांना प्रशिक्षणआरटीपीसीआर प्रयोग शाळेत १५ ते २० कर्मचाºयांची आवश्यकता असते. त्यानुसार सद्यस्थितीत १५ स्थानिक कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. ते सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयातील कर्मचारी आहेत. त्यांना गेल्या १५ दिवसात आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे.सुरुवातीला धुळे प्रयोग शाळेत तपासलेले अहवाल पुन्हा तपासणीसाठी येथे पाठविण्यात येत होते. तेथील प्रयोगशाळेतील निष्कर्ष व येथील निष्कर्ष यांची पडताळणी केली जात होती. त्यात ९० टक्के निष्कर्ष बरोबर निघाल्याने प्रशिक्षीत कर्मचाºयांना आत्मविश्वास आल्याने आता ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.मायक्रोबॉयलॉजिस्ट दाखलप्रयोगशाळेची मुख्य धूरा सांभाळणारे अधिकारी हे मायक्रोबॉयलॉजिस्ट असतात. वैद्यकीय महाविद्यालयातच त्यांची नियुक्ती असते. त्यामुळे नंदुरबारातील प्रयोग शाळेसाठी इतर जिल्ह्यातून संबधीत तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले.धुळ्यातील संबधीत तज्ज्ञ हे धुळे प्रयोगशाळेसाठी आरक्षीत आहेत. त्यामुळे नंदुरबारातील प्रयोगशाळेसाठी बीड येथून हे तज्ज्ञ मागवावे लागले आहेत. सोमवारी सायंकाळी ते येथे दाखल झाले. मंगळवारी त्यांनी पदभार सांभाळला.आरएनए अलगीकरण उपकरणही झाले दाखलप्रयोगशाळेत आरएनए अलगीकरण उपकरणाची कमरता होती. आता ते देखील दाखल झाले आहे. या उपकरणातून स्वॅबमधून आरएनए वेगळा केला जातो. ते देखील उपलब्ध झाल्याने कामाला गती येणार आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ७१७ अहवाल वेटींगवर होते. त्यात सर्वाधिक अहवाल हे नंदुरबार व शहादा तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यातील २५१ इतके होते. शहादा तालुक्यातील २६७, तळोदा तालुक्यातील ९६, नवापूर तालुक्यातील ८३, अक्कलकुवा तालुक्यातील १६, धडगाव तालुक्यातील एकही नाही तर निझर, शिरपूर, निजामपूर येथील चार अहवाल वेटींगवर होते.४नंदुरबारात अहवाल वेळेवर येत नसल्याने अनेक रुग्ण थेट सुरत येथे जाऊन खाजगी लॅबमध्ये तपासणी करून घेत आहेत. तेथेच उपचार घेऊन तेथूनच बरे होऊन येत असल्याचेही चित्र आहे.