शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचा:यांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:04 IST

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेतील 850 कर्मचा:यांना फटका

ठळक मुद्देवर्ग चारच्या कर्मचा:यांना अजूनही आदेश नाही प्रकल्पातील वर्ग चारच्या रोजंदारी कर्मचा:यांना चार महिने उलटूनही अजून आश्रमशाळावरील नियुक्तीचे आदेश प्रकल्पाकडून मिळाले नसल्याचे या कर्मचा:यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कर्मचारी आदेशाविनाच काम करीत आहे. याबाबत सं

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रोजंदारी कर्मचा:यांना देण्यात येणा:या मानधनातून तासाचे मानधन आदिवासी विकास विभागाने अद्यापही न ठरविल्याने तळोदा प्रकल्पातील रोजंदारी  कर्मचा:यांचे गेल्या साडे तीन महिन्यांपासून मानधन थकले आहे. साहजिकच या कर्मचा:यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मानधन देण्याची मागणी आहे.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात साधारण 42 शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा चालविल्या जात आहे. या आश्रमशाळांमध्ये 850 रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि या कर्मचा:यांचे गेल्या साडेतीन महिन्यापासून मानधन थकले आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण घडी विस्कटली आहे. नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून दिवसातील कामाच्या तासाची रक्कम ठरविली जात असल्याने कर्मचा:यांचे मानधनही थकल्याचे सांगितले जात आहे. मात्र या किरकोळ गोष्टीसाठी तब्बल साडेतीन महिने उलटूनही त्यावर कार्यवाही केली जात नाही. साहजिकच या विभागाच्च्या प्रशासनाच्या उदासिनतेबाबत कर्मचा:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचा:यांच्या तक्रारीवरून येथील प्रकल्प प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा देखील केला आहे. मात्र तरीही अजून पावेतो त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने सणा-सुदींपासून वंचित राहावे लागणार असल्याची व्यथा कर्मचा:यांनी व्यक्त केली आहे.आधीच प्रकल्पाने वर्ग तीनच्या कर्मचा:यांना नियुक्तीचे आदेश उशिरा दिले होते. त्यामुळे कर्मचा:यांमध्ये अस्वस्थता होती. आता किरकोळ कारणामुळे साडेतीन महिन्यांपासून मानधन रोखले आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचा:यांबाबत प्रशासनाचे अन्यायाचेच धोरण असल्याचा कर्मचा:यांचा आरोप आहे. वास्तविक हे रोजंदारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून स्थायी कर्मचा:यांप्रमाणे अत्यंत कमी मोबदल्यात इनामे इतबारे आतार्पयत काम करीत आहे. मात्र त्यांचा मानधनाबाबत सुद्धा प्रशासन  सकारात्मक दृष्टीकोन ठेवत नाही. निदान कर्मचा:यांचे मानधन तरी प्रत्येक महिन्यात नियमित देण्यात यावे, अशी कर्मचा:यांची मागणी आहे.