शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 19 लाखाचा शेतसारा होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

नंदुरबार :  दुष्काळ असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील एक लाख 80 हजार शेतक:यांना जमीन महसूलातून सूट मिळणार आहे. साधारणत: 19 ...

नंदुरबार :  दुष्काळ असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील एक लाख 80 हजार शेतक:यांना जमीन महसूलातून सूट मिळणार आहे. साधारणत: 19 लाख रुपयांचा शेतसारा यंदा माफ होणार आहे. या सवलतीत ग्रामपंचायत करांचा समावेश नाही. त्यामुळे दुष्काळात शेतक:यांना हा आर्थिक चटका मात्र सहन करावा लागणार आह़े तळोदा, नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि पीक पैसेवारी देखील 50 पैशांपेक्षा कमी लावण्यात आल्यामुळे हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही मंडळांचा देखील दुष्काळी स्थितीत समावेश करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यशासनाने या चार तालुक्यांना विविध सोयी सवलती प्रदान केल्या आहेत़ यात जमीन महसूलातून सुट देण्यात आली आह़े महसूल विभागाकडून वार्षिक पद्धतीने आकारला जाणारा हा कर एक टक्क्यांपर्यत नाममात्र असल्याने चारही तालुक्यात थकबाकीदार शेतकरी नाहीत़ महसूल    विभागाकडून 1930 पासून जमिनीचा पोत आणि दर्जा पाहून कर आकारण्याची पद्धत आजही कायम आहे. त्यामुळे शेतक:यांना महसूली कराबाबत जादाची रक्कम भरावी लागत नाही़ तळोदा तालुक्यात 12 हजार 160, नंदुरबार 53 हजार 459, नंदुरबार 63 हजार 427 तर नवापूर तालुक्यात 51 हजार 273 शेतकरी जमिन महसूल माफीच्या सवलतीस सध्या पात्र आहेत़ शेतक:यांकडून तळोदा तालुक्यात एक लाख 3 हजार, शहादा आठ लाख, नंदुरबार आठ लाख 28 हजार 900 तर नवापूर तालुक्यात 2 लाख रूपयांचा जमिन महसूल   दरवर्षी भरण्यात येतो़ एकूण 19 लाख रुपयांच्या या कराला यंदाच्या वर्षापुरतीच सूट मिळणार असल्याने शेतक:यांना कराचा भरणा करावा लागणार नसल्याचे महसूल विभागाने म्हटले आह़े नंदुरबार तालुक्यातील 154 गाव हद्दीतील 61 हजार 40 हेक्टर, शहादा तालुक्याच्या 185 गाव हद्दीतील 60 हजार 646 हेक्टर, तळोदा तालुक्यातील 94 गावांच्या हद्दीतील 17 हजार 520 तर नवापूर तालुक्यातील 163 गावातील 57 हजार 625 हेक्टर शेतजमिन या महसूली करातून वगळली जाणार आह़े एकूण 1 लाख 96 हजार 831 हेक्टर हे क्षेत्र असल्याची माहिती आह़े यात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आह़े महसूल विभागाकडून तहसीलदार आणि मंडळनिहाय आकडेवारी संकलन करण्याचे कार्य सध्या सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े