शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

मतदान अधिकारी,कर्मचा:यांचे दोन दिवस जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन काही दिवसांपासून दिवसरात्र राबत आहेत. दोन दिवसांपासून तर जिल्हाधिका:यांपासून तर कर्मचा:यांर्पयत सर्वच 24 तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक विभागाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु शनिवारपासून धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे ईव्हीएमची मोजणी झाली. किती खराब झाले. ते परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. नंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत नंदुरबार येथील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिका:यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचा:यांचे जागरण झाले होते. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागले. सोमवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर मंगळवारी दुपार्पयत कार्यालयातच होते, हे विशेष. या कर्मचा:यांसोबतच मतदान केंद्रांवर डय़ुटी असलेले कर्मचारी देखील दोन दिवस जागले. आदल्या दिवशी मतदान साहित्य घेवून आपापल्या गावाच्या केंद्रावर  पोहचले. काही केंद्रावर पंखे नाही, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव, मोकळ्या हवेची कमतरता यामुळे अशा केंद्रांवरील कर्मचा:यांचे जागरणच झालेच. शिवाय मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र संबधीत विधानसभा मतदार संघ मुख्यालयात पोहचविणे आणि तेथून मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी व घरी जाणे या  सर्व प्रवासाला रात्री 1 ते तीन वाजले होते. त्यामुळे या कर्मचा:यांचे देखील दोन दिवस जागरण झाले.  परंतु राष्ट्रीय कर्तव्याचा अभिमान बाळगत अशा कर्मचा:यांनी   कुठलीही तक्रार किंवा चिडचिडपणा  न करता आपले कर्तव्य  निभावले.दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर काही कर्मचा:यांना सूट देण्यात आली तर बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्यामुळे कर्मचा:यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे.