शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय आदर्श ग्राम समितीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेतर्गत मूल्यांकनाठी राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यात भेट दिली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेतर्गत मूल्यांकनाठी राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यात भेट दिली़ शुक्रवारी भेट देणा:या समितीने नवापुर तालुक्यातील दोन गावांमधील कामांची पाहणी केली़         जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायती ग्राम सामाजिक परितर्वन अभियानात सहभागी आहेत़ यातील पहिल्या टप्प्यात 10 ग्रामपंचायतींनी विविध विकासकामे पूर्ण करुन दाखवली होती़ या 10 गावांनी परीवर्तन अभियानांतर्गत घोषित केलेल्या आदर्श ग्राम योजनेसाठी प्रस्ताव दिला होता़ यातील नवापुर तालुक्यातील वाटवी आणि चिखली या दोन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी देण्यात आले होत़े या दोन्ही गावांमधील सामाजिक, आर्थिक व विविध कामांची माहिती घेण्यासाठी आदर्शगाव संकल्प व प्रकल्पाचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातील राज्य समितीने शुक्रवारी जिल्ह्यात भेट दिली़ समितीत जलसंधारण व रोहयो विभागाचे उपसचिव प्रमोद शिंदे, कृषी सहसंचालक अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचा समावेश होता़ समितीने नवापुर तालुक्यातील चिखली आणि वाटवी येथे भेट देत माहिती घेतली़    समितीने चिखली येथील महिला आणि पुरुष ग्रामस्थांच्या भेटी घेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली़ प्रारंभी दोन्ही समिती सदस्यांचे चिखली येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करुन बैलगाडीवरुन त्यांची मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी ग्रामस्थांनी पांरपरिक ढोल व बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यू केल़े अभियानाच्या जिल्हा समन्वयक अॅड़ योगिनी खानोलकर यांनी पोपटराव पवार व ज्ञानेश्वर बोटे या दोघांना राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली़ जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी शेखर रौंदळ यांनी समितीचे नंदुरबार येथे स्वागत केले होत़े दोन्ही गावांच्या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मिशन मॅनेजर प्रफुल्ल रंगारी उपस्थित होत़े ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सिंदगव्हाण ता़ नंदुरबार, चिखली, भादवड, बिजगाव, बोरचक, निंबोणी, वाटवी ता़ नवापुर, खरवड, राडीकलम, खांडबारा, बोरवण, चोंदवाडे बुद्रुक, खडक्या, मनखेडी बुद्रुक, मनवाणी बुद्रुक, चुलवड, सोन बुद्रुक ता़ धडगाव तसेच डेब्रामाळ, होराफळी, डनेल आणि कुकडीपादर ता़ अक्कलकुवा या ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आह़े याठिकाणी विविध उपक्रम राबवून गावातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े यातील 10 ग्रामपंचायतींनी आदर्श गाव योजनेत सहभाग घेतला होता़ त्यातील वाटवी, चिखली या दोन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होत़े यांतर्गत समिती मूल्यांकनासाठी जिल्ह्यात दाखल झाली होती़ भेटीदरम्यान पोपटराव पवार यांच्याहस्ते भादवड येथील जलशुद्धीकरण व वितरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आल़े हे पाणी बचत गटांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येऊन रोजगार उपलब्ध होणार आह़े