शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात युवकाच्या खून प्रकरणाला हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 16:28 IST

जमावाचा हल्ला : वाहन व घरांची तोडफोड लोकमत ऑनलाईन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : युवकाच्या खून प्रकरणाला बुधवारी दुपारी हिंसक वळण लागून जमावाने अनेक घरांवर दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. दिवसभर शहरात अघोषीत संचारबंदी होती. अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री पोलीस वसाहतीतील रवींद्र सोमा मोरे (25) रा.नवीन पोलीस वसाहत या युवकाचा चार युवकांनी खून केला होता. या प्रकरणी बुधवारी संतप्त झालेल्या जमावाने साक्रीनाका, चौधरी गल्ली, बागवान गल्ली परिसरात तुफान दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. जमावाकडून दोन चारचाकी वाहने जाळण्यात आली तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दहा ते 12 दुचाकींचेही नुकसान केले. अनेक घरांवर दगडफेक करीत नुकसान केले.या घटनेमुळे शहरात अघोषीत संचारबंदी सदृष्य स्थिती निर्माण झाली. सायंकाळर्पयत मुख्य बाजारपेठेसह सर्वच भागात शुकशुकाट होता. पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैणात केला आहे. याप्रकरणी सायंकाळी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू   होते.