शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मांजरे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:15 IST

नंदुरबार : तालुक्यातील मांजरे येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचे वासरु ठार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती़ हल्ला करणारा ...

नंदुरबार : तालुक्यातील मांजरे येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचे वासरु ठार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती़ हल्ला करणारा हिंस्त्र प्राणी हा बिबटय़ाच असल्याचे सांगण्यात आले असून यामुळे परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आह़े हल्ला करणारा बिबटय़ा हा शहादा तालुक्यात मांजरे शिवारात आल्याची माहिती वनविभागाने दिली आह़ेमांजरे शिवारातील गाय  ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली होती़ या पाहणीत शेतशिवारात हिंस्त्र प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होत़े या ठश्यांचे परीक्षण केल्यावर ते बिबटय़ाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ यानंतर केलेल्या तपासणीत बिबटय़ाने हल्ल केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आह़े या पाश्र्वभूमीवर वनविभागाकडून मांजरे, आराळे, निंभेल, कं्रढे यासह विविध गावांमध्ये वनपाल आणि वनरक्षक यांच्या गस्ती पथक सुरु करण्यात आली आहेत़ या पथकांकडून रात्री उशिरार्पयत ही गस्त सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े  अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबटय़ाने या भागात धाव घेतल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आला आह़े वनक्षेत्रातून या भागात आलेल्या बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतीकामांवर ब:याच अंशी परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आह़े दुष्काळी भाग असल्याने याठिकाणी बिबटय़ाला जादा दिवस अन्न व पाणी न मिळाल्यास पाळीव गुरांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याने वनविभागाकडून बिबटय़ाला हुसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत़ सातपुडय़ातील वनक्षेत्रात पाणवठे आणि अन्नाची कमतरता असल्याने हिंस्त्र प्राणी बाहेर पडल्याचे वनविभागाचे म्हणणे आह़े नंदुरबार तालुक्यातील काही भागात तरसांचा कळप फिरत असल्याची माहिती आह़े  तळोदा आणि शहादा तालुक्यात आजघडीस चारपेक्षा अधिक बिबट असल्याची माहिती देण्यात आली आह़े तसेच धडगाव तालुक्यात चार बिबटे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेमांजरे शिवारातील लखेसिंग गणपत राऊळ यांच्या शेतातील गायीचा बळी जाण्याच्या 15 दिवसांपूर्वी हिंस्त्र प्राण्याने शेळीला ठार केल्याचे सांगण्यात आले आह़े ही शेळी तरसाने ठार केली असावी असा अंदाज होता़ परंतू गायीवर हल्ला झाल्यानंतर बिबटय़ाचा संचार असल्याचे सांगितले जात आह़े वनविभागाकडून या भागात शेतशिवारात थांबलेले ठेलारी कुटूंबिय आणि आदिवासी बांधव यांच्या भेटी घेत त्यांना सूचना केल्या आहेत़ ठेलारींकडे असलेल्या मेंढय़ांवर हल्ला होण्याचा दाट संभव असल्याने त्यांना हिंस्त्र प्राण्यापासून पाळी जनावरांची सुरक्षा कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आह़े यातील काही जण पूर्वीपासून प्रशिक्षित असले तरी त्यांच्या कुटूंबातील इतरांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आह़े  नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातही वनविभागाने गस्त सुरु केली असून बिबटय़ाचा माग काढण्याचा प्रयत्न होत आह़े बिबटय़ाला या भागात स्थिरावू न देण्याचा प्रयत्न वनविभागाचा आह़े कोपर्ली ते मांजरे तसेच विविध भागातील पाणथळ जागा आणि दाट झाडीसह निजर्न टेकडय़ांमध्ये बिबटय़ा लपण्याची शक्यता असल्याने उपाययोजनांना वेग दिला जात आह़े